lpg gas cylinder Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत LPG काळाबाजारावर शिधावाटप विभागाची धाड! वरळीत साठेबाजीचा भंडाफोड; मोठा साठा जप्त

mumbai crime news : मुंबईत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड झालाय. कारवाईत मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मोठा साठा जप्त

मुंबईतील वरळीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक कारवाई केली. या कारवाई पथकाने मोठा साठा जप्त केलाय. रहिवासी राहत असलेल्या भागात धोकादायक पद्धतीने सिलिंडरची साठेबाजी केली जात होती. त्यानंतर हे सिलिंडरची काळ्यात बाजारात विक्री केली जात होती.

शिधावाटप विभागाचे फिरते पथक आणि कार्यालय क्रमांक २१ च्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई केली. वरळीतील नाका येथील गणपतराव कदम मार्गावरील ‘सूरज वल्लभदास चाळ’ परिसरात गॅस सिलिंडरची अवैध साठेबाजी सुरू होती. या साठेबाजीद्वारे चढ्या दराने विक्री केली जात होती. याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तातडीने छापा टाकला. त्यानंतर अवैधरित्या साठवलेले सिलिंडर जप्त केले.

कारवाईत काय आढळलं?

कारवाईत एचपी गॅस कंपनीचे पाच किलोचे सहा भरलेले आणि ५८ रिकामे सिलिंडर जप्त करण्यात आले. त्याचबरोबर सुपर गॅस कंपनीचे चार किलोचे ६४ भरलेले सिलिंडर आढळले. त्याचबरोबर १२ किलोचे १९ भरलेले सिलिंडर जप्त करण्यात आले. याशिवाय १२, चार आणि दोन किलोचे विविध आकाराचे २५ रिकामे सिलिंडर घटनास्थळी सापडले.

सिलिंडर बेकायदेशीररित्या रिफिलिंग करून काळ्या बाजारात विकण्यात येत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल वरळी पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. रहिवासी भागात अशा प्रकारे सिलिंडर साठवणे आणि त्यांची बेकायदेशीर विक्री करणे अत्यंत धोकादायक बाब मानली जाते. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विभागाची पथके २४ तास सतर्क असल्याचा इशाराही प्रशासनाने दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT