Crime Saamtv
मुंबई/पुणे

Pune: एकतर्फी प्रेम, जबरदस्ती शारीरिक संबंध अन् लग्न, तरुणीचा तरीही नकार, शेवटी आरोपीनं; पुण्यात खळबळ

Pune Police Register Case Against Man for Forced Marriage: पुण्यात एकतर्फी प्रेमातून धक्कादायक प्रकार घडला आहे. जबरदस्तीने प्रेम मिळवण्यासाठी आणि लग्न करण्याच्या उद्देशाने एका तरुणाने तरुणीला सातत्याने त्रास दिला आहे.

Bhagyashree Kamble

जबरदस्ती प्रेम मिळवण्यासाठी काहीजण टोकाचं पाऊल उचलतात, आणि असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. एका तरूणाने जबरदस्तीने लग्न करण्याच्या उद्देशाने पीडित तरूणीला सातत्याने त्रास दिला आहे. तसेच ५० लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्याने शिवीगाळ, मारहाण आणि धमकी दिली. या प्रकरणात पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित कांबळे (वय वर्ष २४) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरूणी पुण्यातील कोंढवा परिसरातील रहिवासी. ते एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. आरोपीने पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. तसेच ५० लाख रूपयांची मागणी केली.

पीडित तरूणीने नकार दिल्यामुळे आरोपीने मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिचे नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर आरोपीने जबरदस्तीने तिला गाडीत बसवून मंदिरात नेले आणि तिथे लग्न केले. तरीही पीडित महिला आरोपीसोबत राहण्यास तयार नव्हती. त्याने पीडितेचे नग्न अवस्थेतील फोटो तिच्या वडिलांना पाठवले. तसेच पीडितेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.

याच त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

SCROLL FOR NEXT