Lok Sabha Election 2024  Saam Tv
मुंबई/पुणे

Lok Sabha Election 2024 : राज्यात पाच टप्प्यात मतदान; तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha : देशात ७ टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. तर राज्यात ५ टप्प्यात निवडणूक होणार आहे. तुमच्या लोकसभा मतदारसंघात मतदान केव्हा असणार, जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

Lok Sabha Election Update :

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या घोषणेनंतर निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. देशात ७ टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. तर राज्यात ५ टप्प्यात निवडणूक होणार आहे. तुमच्या लोकसभा मतदारसंघात मतदान केव्हा असणार, जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभेच्या तारखेची घोषणा केली आहे. लोकसभेसाठी आयोगाने वरिष्ठ पातळीवर मोठी तयारी केली आहे. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत देशातील मतदान केंद्रे, कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था आणि बूथ केंद्रावरील महत्वाची माहिती दिली. यावेळी राज्यात किती टप्प्यात मतदान होणार, याबाबतही माहिती दिली.

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

◾पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, गडचिरोली-चिमूर, नागपूर, भंडारा-गोंदीया, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल - यवतमाळ - वाशिम, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे - माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे - शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड,नंदूरबार, जळगाव, मावळ, पुणे, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर,

◾️पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, कल्याण, ठाणे, नाशिक, पालघर, भिवंडी, मुंबईतील सहा मतदारसंघ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT