Maharashtra Election 2024 Date: राज्यात ५ टप्प्यात निवडणुका! तुमच्या मतदारसंघात मतदान अन् निकालाचा गुलाल कधी? वाचा

Maharashtra Lok Sabha Election 2024 Dates and Result Date News in Marathi: लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग आज निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. यासोबतच आंध्र प्रदेश आणि ओडिशासह चार राज्यांच्या निवडणुकांच्या तारखाही निवडणूक आयोग जाहीर करणार आहे.
Chief Election Commissioner Rajiv Kumar Explained That The Election Will Be Held in Seven Phases
Chief Election Commissioner Rajiv Kumar Explained That The Election Will Be Held in Seven Phases Saam TV

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. १६ मार्च २०२४

Maharashtra Election 2024 Date Declared

आज लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजणार वाजले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज लोकसभेचे वेळापत्रक (Lok Sabha Election 2024 Schedule) जाहीर केले. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सात टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्रात २० मे ला लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करण्यात येणार आहे.

राज्यात ५ टप्प्यात निवडणुका!

लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल. 26 एप्रिलपासून, 7 मे, १३ मे, २० मे, २५ मे रोजी मतदान असेल तर ४ जूनला मतमोजणी होईल, अशी माहिती केंद्रीय निवडणुक आयुक्तांनी दिली आहे. तसेच तसेच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. (Maharashtra News)

राज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होईल. तसेच दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी, चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे, पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे, सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे रोजी आणि सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे.

Chief Election Commissioner Rajiv Kumar Explained That The Election Will Be Held in Seven Phases
Maharashtra Lok Sabha Election : महायुतीच्या जागा वाटपावर ८० टक्के काम पूर्ण; शिंदे, अजित पवार गटाच्या जागांबाबत फडणवीस काय म्हणाले?

असे असेल मतदान..

पहिला टप्पा, ता. १९ एप्रिल: रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर,

दुसरा टप्पा, ता. २६ एप्रिल: बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीला मतदान होईल.

तिसरा टप्पा, ता. ७ मे: रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगलेला मतदान होईल.

चौथा टप्पा, ता. १३ मे: नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा, ता.२० मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

Chief Election Commissioner Rajiv Kumar Explained That The Election Will Be Held in Seven Phases
Khaire Vs Danve: खैरे नेहमीच मला डावलत आले, दानवे शिंदे गटात जाणार? मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com