लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आज निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होत आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांच्यसह निवडणूक आयुक्त एस.एस. सिंह आणि ज्ञानेश कुमार यांच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे.
तारखांची घोषणा करण्यापूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी निवडणूक आणि मतदारांबाबतची आकडेवारी तसेच आतापर्यंत झालेल्या तयारीबाबत माहिती सांगितली आहे.
एकूण मतदार किती?
निवडणूक आयोग या लोकसभा निवडणुकीसाठी योग्य टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे. मनुष्यबळासाठी देखी आम्ही परिपूर्ण आहोत. लोकसभा निवडणुकीत 97 कोटी लोक मतदान करणार आहेत. यामध्ये 82 लाख मतदार हे 85 पेक्षा जास्त वयाचे आहेत. तर 48 हजार तृतीयपंथीय मतदान करणार आहेत.
फर्स्ट टाइम व्होटर किती?
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 1.8 कोटी तरुण फर्स्ट टाइम व्होटर असणार आहेत. देशातील 18 ते 19 या वयातील तब्बल 1.8 कोटी तरुण पहिल्यांदाच आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
महिलांचा मतदानाचा वाटा वाढला
महिला मतदारांची संख्या वाढत आहे. 12 राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. 85 पेक्षा जास्त वयाच्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतल जाणार आहे. एकाचवेळी देशात हा प्रयोग आम्ही पहिल्यांदा करत आहोत, असं मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.