मुंबई : गणेशभक्त कोकणाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. मुंबईतील चाकरमानी कुटुंबांसोबत कोकणाकडे निघाले आहेत. कोकणाकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेन प्रवाशांनी खच्च भरलेल्या आहेत. यामुळे काही चाकरमानी रस्ते मार्गाने कोकणाकडे निघाले आहेत. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गाड्यांची टोलमाफी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चारमान्यांच्या सर्व प्रकारच्या खासगी वाहनांचा टोल माफ करावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागातून लाखो गणेशभक्त कोकणातील गणेशोत्सवासाठी मूळ गावी जातात. या वर्षी देखील शेकडो कोकणी बांधव गणेशोत्सवासाठी निघाले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४ सप्टेंबर २०२४ रोजी कोकणातील गणेशभक्त मूळ गावी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने निघणार आहेत.
४ सप्टेंबर २०२४ पासून ते संपूर्ण गणेशोत्सापर्यंत कोकणात गणेशोस्वासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना टोल माफी करावी. तसेच याची कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्या यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, आमदार अजय चौधरी यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना टोल माफी देण्याची मागणी केली आहे. मागणी करून देखील सरकार केवळ घोषणा करतंय, पण सत्यात उतरवत नाही, असा आरोप आमदार अजय चौधरी यांनी केला आहे. महाड मार्गे अथवा दुसऱ्या मार्गे जाताना कोकणवासियांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. त्यात एसटी आंदोलन सुरु आहे. सरकार याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे. कोकणवासी गावाला जायला निघाले आहेत, तर लवकरात लवकर टोल माफी द्या, अशी मागणी आमदार अजय चौधरी यांनी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.