Ganesh Festival : गणेश मूर्तींच्या किमतीत यंदा २५ टक्क्याची वाढ; कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचा परिणाम

Nandurbar News : गणेशोत्सवात गणेश मूर्तींच्या किमती वाढणार आहेत. भक्तांना मूर्ती खरेदी करताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत
Ganesh Festival
Ganesh FestivalSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतींमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने या वर्षीच्या गणेशोत्सवात गणेश भक्तांना मूर्ती खरेदी करताना महागाईचा फटका बसणार आहे. गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश कारखान्यांमध्ये गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे. 

Ganesh Festival
Dhule News : यंदा धुळेकरांच्या घरात विराजमान होणार कैद्यांनी बनविलेले बाप्पा; कारागृहात बनविल्या ५०१ मुर्त्या 

पेणच्या गणेश मुर्त्यानंतर देशभरात (Nandurbar) नंदुरबारमधील गणेश मुर्तीची मोठ्या प्रमाणात मागणी असते. देशाच्या विविध भागांप्रमाणे विदेशातही नंदुरबारच्या गणेश कारखान्यांमधून तयार झालेल्या गणेश मुर्त्या जात असतात. मात्र यावर्षी गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल अर्थात पीओपी, शाडू माती तसेच रंग २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या (Ganesh Festival) गणेशोत्सवात गणेश मूर्तींच्या किमती वाढणार आहेत. भक्तांना मूर्ती खरेदी करताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

Ganesh Festival
Online Fraud : शेअर मार्केटच्या बनावट ॲपद्वारे नऊ लाखांत फसवणूक; भुसावळच्या एकजण ताब्यात

नंदुरबारच्या गणेश कारखान्यांमध्ये दहा लाख पेक्षा अधिक गणेश मुर्त्या विक्रीसाठी तयार झाले आहेत. गणेश कारखान्यांमध्ये सहा इंचापासून तो २५ फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी तयार झाल्या असून गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात बुक करण्यात आली असून येत्या काही काळात या गणेश मूर्ती मंडळांकडे रवाना होणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com