Dhule News : यंदा धुळेकरांच्या घरात विराजमान होणार कैद्यांनी बनविलेले बाप्पा; कारागृहात बनविल्या ५०१ मुर्त्या 

Dhule News : गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल आता सर्वत्र जाणवु लागली आहे. धुळ्यात देखील कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेले दहा कैदी हे या मूर्ती बनविण्याच्या कामात जुंपले
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. यामुळे गणेश मूर्ती साकारण्याचे वेगाने सुरु आहे. त्यानुसार धुळे कारागृहात असलेले कैदी देखील सुबक मूर्ती साकारत असून यंदा धुळेकरांच्या घरात धुळे मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी बनविलेले बाप्पा विराजमान होणार आहेत.  

Dhule News
Sangamner News : आरोपींना फाशी द्या, चिमुकल्या मुलींना न्याय द्या; बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थिनी उतरल्या रस्त्यावर

गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल आता सर्वत्र जाणवु लागली आहे. धुळ्यात (Dhule) देखील कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेले दहा कैदी हे या मूर्ती बनविण्याच्या कामात जुंपले आहेत. गेल्या वर्षी देखील कारागृह प्रशासनातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाला धुळेकर गणेश भक्तांनी (Ganesh Festival) चांगला प्रतिसाद देखील दिला होता. त्यामुळे यंदा देखील कारागृह प्रशासनातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

Dhule News
Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारत कोसळली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

कारागृहातील या कैद्यांनी २१ प्रकारच्या गणपती बाप्पाच्या सुबक अशा जवळपास ५०१ मुर्त्या बनविल्या आहेत. त्यात लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई गणपती, गरुडावर विराजमान गणपती, बालगणेश, फेटा घातलेले गणेश अशा मुर्त्या बनविल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व मुर्त्या पर्यावरण पूरक असून शाडू मातीच्या सहाय्याने या सर्व मुर्त्या बनविण्यात आल्या आहे. या मुर्त्या कारागृह प्रशासनातर्फे बाजारात विकण्यात देखील येणारा आहेत. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांच्या हाताला काम मिळावे. त्यांच्या कलागुणांचा वापर करून त्यांना दोन पैसे पदरात पडावेत, या उद्देशाने कारागृह प्रशासनातर्फे हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com