Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारत कोसळली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Ulhasnagar News : उल्हासनगरमधील कॅम्प ५ मधील ओल्ड नवजीवन ही इमारत अतिधोकादायक असल्याने महापालिकेने नोटीस देत इमारत खाली करण्यात आली होती.
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv
Published On

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एका अतिधोकादायक इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. कॅम्प ५ मधील ओल्ड नवजीवन या इमारतीचा भाग कोसळला आहे. या हि इमारत दोन महिन्यांपूर्वी खाली करण्यात आली असल्याने सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही.

Ulhasnagar News
Nashik Airport : नाशिकहून आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा; १२ सप्टेंबरपासून उड्डाण

उल्हासनगरमधील (Ulhasnagar News) कॅम्प ५ मधील ओल्ड नवजीवन ही इमारत अतिधोकादायक असल्याने महापालिकेने नोटीस देत इमारत खाली करण्यात आली होती. उल्हासनगर महानगरपालिकेने दोन महिन्यांपूर्वीच इमारत रिकामी केली होती. तसेच इमारत मालकाला ती निष्कासित करण्याची नोटीस देखील देण्यात आली होती. मात्र घर मालकाने याकडे दुर्लक्ष केलं आणि बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या इमारतीचा अर्धा भाग कोसळला. सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही. 

Ulhasnagar News
Sangamner News : आरोपींना फाशी द्या, चिमुकल्या मुलींना न्याय द्या; बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थिनी उतरल्या रस्त्यावर

आता महापालिकाच करणार इमारत निष्कासित 

दरम्यान, इमारत रिकामी करण्यात आली असली, तरी तळमजल्यावर काही दुकानं अजूनही सुरू असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे आता ज्या इमारती धोकादायक घोषित करून रिकाम्या केला जातील. त्यांच्यावर महापालिकेकडूनच निष्कासनाची कारवाई केली जाईल, अशी माहिती उल्हासनगर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com