Sangamner News : आरोपींना फाशी द्या, चिमुकल्या मुलींना न्याय द्या; बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थिनी उतरल्या रस्त्यावर

Sangamner News : बदलापूर येथे चार वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे
Sangamner News
Sangamner NewsSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहमदनगर) : बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ संगमनेर येथे शालेय विद्यार्थिनींनी आज मोर्चा काढत निदर्शने केली. आरोपींना फाशी द्या, चिमुकल्या मुलींना न्याय द्या, हमे चाहिए आजादी, अशा घोषणांनी बसस्थानक परिसर दणाणून गेला होता.

Sangamner News
Jawhar News : जव्हार नगरपरिषदेच्या कारभाराविरुद्ध नागरिक आक्रमक; निषेध मोर्चा काढत शहर बंद

बदलापूर (Badlapur) येथे चार वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत. मुलींवर अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे महिला- मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे बदलापूर येथील घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी; या मागणीसाठी आज संगमनेरमध्ये (Sangamner) हजारो शाळकरी मुली रस्त्यावर उतरल्या होत्या. शहरातून निषेध फेरी काढत बसस्थानकासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. 

Sangamner News
Nashik Airport : नाशिकहून आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा; १२ सप्टेंबरपासून उड्डाण

सह्याद्री विद्यालयापासून निघालेल्या या मोर्चात जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशन व विविध महिला संघटनांच्यावतीने भव्य निषेध मोर्चा झाला. यामध्ये दुर्गाताई तांबे, सुनीता कोडे, डॉ. श्रद्धा वाणी, सुनीता कांदळकर, शितल उगलमुगले, सुरभी मोरे, नम्रता पवार, यांच्यासह ३ हजार मुली सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थिनींनी नवीन नगर रोड, लिंक रोड, पुणे नाशिक हायवे ते बस स्थानक अशा निषेध मोर्चात नराधम आरोपींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. फाशी द्या, फाशी द्या आरोपींना फाशी द्या. मुलगी वाचवा, देश वाचवा, फुल नही, चिंगारी है, ये भारत की नारी है, अशा घोषणा देऊन या आरोपींना तात्काळ फाशी द्या अशी मागणी केली. यावेळी भावना व्यक्त करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या बहिण दुर्गा तांबे भावूक झाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com