फैय्याज शेख
जव्हार : जव्हार शहर हे ऐतिहासिक परंपरा आणि इतिहास प्रसिद्ध म्हणून शहर ओळखले जाते. मात्र दुर्दैवाने आज जव्हार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे शहर बजबजपुरी व भकास होत चालले आहे. सुविधा मिळत नसल्याने शहरातील नागरिक आक्रमक झाले असून या विरोधात निषेध मोर्चा काढत शहर बंद ठेवले आहे.
जव्हार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक मानिनी कांबळे यांच्या गलथान व अनियोजित कारभारामुळे जव्हार शहरात मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवत आहेत. तसेच नागरी सुविधांचा अभाव आहे. याशिवाय मागील काळात भ्रष्टाचार झाल्याचे देखील उघड झाले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून त्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र नगरपरिषदेचा सुरु असलेल्या गलथान कारभार अदयाप सुधारत नाही. यामुळे शहरात सुविधा देखील मिळत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे.
नागरिक आक्रमक
नगरपरिषदेच्या गलथान व मनमानी कारभाराविरुद्ध जव्हारकर नागरिकांच्यावतीने 'मी जव्हारकर' अभियान राबविले जात आहे. या अभियानात जव्हार नगरपरिषद व मुख्याधिकारी मानिनी कांबळे यांच्या विरोधात काळ्या फिती लावून मोर्चा देखील काढत निषेध करण्यात आला. यावेळी जव्हार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.