Lawrence Bishnoi Gang Saam Tv
मुंबई/पुणे

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी टेन्शन वाढवलं, आर्थर रोड तुरुंगात टोळी युद्धाची भीती

Arthur Road Jail: लॉरेन्स बिश्नोई गँगमधील सदस्यांची अन्य कारागृहात बदली करण्यासाठी अर्थर रोड तुरुंग प्रशासनाने न्यायालयात अर्ज केला आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

लॉरेन्स बिश्नोई गँग नेहमी चर्चेत असते. सध्या ही गँग पुन्हा चर्चेत आली आहे. कारण लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य कैद असलेल्या आर्थर रोड कारागृहात टोळीयुद्धाची भीती आहे. आर्थर रोडमध्ये असलेल्या या गँगमुळे टेन्शन वाढले आहे. टोळी युध्दाची भीती लक्षात घेता लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्यांची अन्य कारागृहात बदली करण्यासाठी तुरुंग प्रशासनाने न्यायालयात अर्ज केला आहे.

अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील काही सदस्यांना अन्य तुरुंगात हलवण्याची मागणी तुरुंग प्रशासनाने न्यायालयाकडे केली आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकूण २० आरोपींना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे.आरोपी तुरुंगात स्वतःचा गट तयार करू शकतात त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती कारागृह प्रशासनाने व्यक्त केली आहे.

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी १५ आरोपी तर सलमान खानच्या घरावरील गोळीबारातील ५ आरोपी सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थर रोड कारागृहात आधीच कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक असून कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास कारागृहात अराजकता निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींना उच्च सुरक्षा कक्षात ठेवण्यात आले आहे. जेणेकरून ते इतर कैद्यांशी संपर्क करू शकणार नाहीत. आर्थर रोड कारागृहात डी-गँग आणि छोटा राजनच्या टोळीच्या सदस्यांसह विविध टोळ्यांचे सदस्य देखील बंदिस्त आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT