Baba Siddiqui Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यात रचला, आणखी चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Baba Siddiqui Death Case Update: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यातील कर्वेनगरमध्ये रचला गेला होता. शुभम लोणकरच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
Baba Siddiqui Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यात रचला, चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Baba Siddique Latest NewsSaam TV
Published On

सागर आव्हाड, पुणे

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादाक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट पुण्यातील कर्वेनगर भागात रचण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

प्रवीणचा भाऊ शुभम लोणकर हा अजूनही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. शुभमच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम मोहोळ आणि रियान खान अशी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून प्रवीण लोणकर, धर्मराज कश्यप, गुरुनील सिंग या तिघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. प्रवीण लोणकर कर्वेनगर भागात डेअरी चालवायचा. प्रवीण आणि त्याचा भाऊ शुभम समाजमाध्यमातून बिश्नोई गँगच्या सराइतांच्या संपर्कात होते. महत्वाचे म्हणजे बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कात प्रवीण आणि शुभम होते. बिश्नोई टोळीला पिस्तूल पुरविल्याप्रकरणी शुभमला अकोला पोलिसांनी अटक केली होती.

Baba Siddiqui Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यात रचला, चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Pune Crime: हृदयद्रावक! आधी फासावर लटकवलं, नंतर श्वानावर गोळ्या झाडल्या; पुण्यातील धक्कादायक प्रकार

कर्वेनगर भागातून बुधवारी ताब्यात घेण्यात आलेले चौघे जण शुभमच्या संपर्कात होते. बिष्णोई टोळीने शहरातील एका सराफी पेढीच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. तसंच, शंकरशेठ रस्त्यावरील एका सामाजिक कार्यकर्त्याला त्यांनी धमकावल्याचा प्रकार नुकताच समोर आला. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Baba Siddiqui Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यात रचला, चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Pune Khed Shivapur News : कारमधील 'ते' ५ कोटी कोणाचे? चार जण ताब्यात, पोलिसांनी काय सांगितलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com