Anil Deshmukh: अनिल देशमुखांचा जबाब नोंदवण्यासाठी सीबीआयची टीम आर्थर रोड कारागृहात

100 कोटी वसुली प्रकरणात आज पुन्हा एकदा त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSaam Tv
Published On

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवण्यासाठी आज सीबीआयची टीम आर्थर रोड कारागृहात पोहोचली आहे. 100 कोटी वसुली प्रकरणात आज पुन्हा एकदा त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे (CBI team at Arthur Road jail to record Anil Deshmukhs statement).

Anil Deshmukh
नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये एकत्र डबा खातील; मोहित कंबोजांचा चिमटा

सीबीआय (CBI) चे अधिकारी आर्थर रोड कारागृहात दाखल झाले आहेत. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जवाब नोंदवण्यासाठी सीबीआयची टीम आर्थर रोड कारागृहात पोहोचली आहे. 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवणार आहे.

अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवण्यासाठी सीबीआयने जबाब नोंदवण्यासाठी मागील आठवड्यात न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सेशन कोर्टाने सीबीआयचा अर्ज मंजूर केला. सीबीआय आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) तीन दिवस जबाब नोंदवणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 3, 4 आणि 5 मार्चला सीबीआय अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवणार आहे. सीबीआयने यापूर्वी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचे जबाब नोंदवले आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com