नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये एकत्र डबा खातील; मोहित कंबोजांचा चिमटा

आज माझ्यावर गुम्हा दाखल झाला. मी याबाबत कोर्टात जाणार आहे.
Mohit Kamboj
Mohit KambojSaam Tv
Published On

सुमित सावंत

मुंबई - भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात मुंबईतील (Mumbai) सांताक्रूझ पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड नियमांचे उल्लंघन करण्यासह शस्त्रास्त्र कायद्यांच उल्लघंन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर मोहित कंबोज (Mohit Kamboj) प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जेलमध्ये नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) एकत्र डबा खातील. सलिम जेलमध्ये आहे आता जावेद बाकी आहे असे देखील मोहित कंबोज म्हणाले.

नवाब मलिक आधी सपामध्ये होते. त्यांनंतर ते राष्ट्रवादीत आले. 1993 च्या ब्लास्टशी नवाब मलिक यांचे धागेदोरे तर जोडले गेले नाहीत ना? याचा तपास व्हायला हवा. काल जी नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली. नवाब यांचा नकाब उतरताना देशाने पाहिले. राज्यातले आमदार, एका पक्षाचे प्रवक्ते यांचे संबंध 1993 च्या ब्लास्टमधील आरोपीशी आहे. झवेरी बाजार मधला ब्लास्ट आम्ही पाहिला. अशा लोकासोबत मलिक यांचे संबंध आणि पैशाचे व्यवहार देखील झाले आहेत असा गंभीर आरोप कंबोज यांनी यावेळी केला.

हे देखील पहा -

पुढे पुढे आणखी गोष्टी उघड होतील. नवाब मलिक यांच्या जावयाला गांजा सोबत पकडलं. आंतरराष्ट्रीय ड्रग्स पेडलर आणि नवाब मलिक यांचे काय संबंध आहेत हे समोर यायला हवे. खोटे पेपर बनवून नवाब मलिकने कंपनीचा राजीनामा दिला. राज्यात असे नेते आपल्याला हवेत का? देशविघातक कृत्य करणारा नेता आपल्याला हवा का? असा सवाल देखील कंबोज यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले की, पक्ष कोणताही असो पण देश महत्वाचा आहे. महाविकास आघाडी सरकारने लोकांच्या भावना समजायला हव्यात राजकारण करू नये. जे राज्याचे आणि देशाचे दुष्मन आहेत असे लोक आपल्यासोबत आहेत याचा विचार महाविकास आघाडी सरकारने केला पाहिजे. 3 हजार करोडची संपत्ती भ्रष्टाचार करीत, आंतरराष्ट्रीय टेरेरिस्टच्या माध्यमातून कमावली आहे. वरळी, वांद्रेतील घर असो, किंवा कुर्ला येथील शाळा असो याचा तपास एजन्सीने केला पाहिजे. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही लढाई लढत राहू असं देखील ते म्हणाले.

ड्रग्स प्रकरणी मुंबई पोलीस एसआयटीची चौकशी करण्यासाठी सक्षम नसतील तर हा तपास पुढे गेला पाहिजे. पूजा ददलानी सोबत काय व्यवहार झाला याची चौकशी व्हायला हवी. ज्या प्रॉपर्टीचा काल ईडीचे तपास केला त्यात डान्सबार चालत होता याचा तपस व्हायला हवा.

Mohit Kamboj
Nitesh Rane: नितेश राणे म्हणतात...आता भगव्याची जबाबदारी आमची

अंडरवर्ल्डशी संबंध, वेश्या व्यवसाय आणि ड्रग्सशी संबंध त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा. काल काही माझे कार्यकर्ते आले आणि त्यांनी मला डमी तलवार दिली. पोलीस आले आणि माझ्याकडून डमी तलवार घेऊन गेले. आज माझ्यावर गुम्हा दाखल झाला. मी याबाबत कोर्टात जाणार आहे असं ही कंबोज म्हणाले.

बांगलादेशी महिलांना वेश्या व्यवसायात टाकण्याचे काम नवाब मलिक करत होते माझ्याकडे तसे व्हिडिओ आहेत. ते मी व्हिडिओ समोर आनणार आहे असा खळबळजनक आरोप कंबोज यांनी मालिकांवर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com