Baba Siddique Latest News Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली बाबा सिद्धीकींच्या हत्येची जबाबदारी; मारण्याचं कारणही सांगितलं

Baba Siddique Death Responsibility : बाबा सिद्धीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हत्येचं कारणही सांगतलं

Satish Daud

Baba Siddique Death Responsibility : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची काल शनिवारी (ता. १२) मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे परिसरात रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तीन आरोपींनी त्यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. आता बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट केली आहे.

यात त्यांनी बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचं कारण देखील सांगितलं आहे. तसेच या हत्येला बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. बिश्नोई गँगने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "ओम जय श्री राम, जय भारत मला जीवनाचे सार समजते. मी शरीर आणि पैसा याला धूळ मानतो. तेच सत्कर्म केले गेले, तेच मैत्रीचे कर्तव्य होते. सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते पण तू आमच्या भावाचे नुकसान केले".

आज जे बाबा सिद्दी यांचं कौतुक केले जातेय, पण एक वेळ तो दाऊदसोबत मकोका कायद्याखाली होता. त्याला मारण्याचे कारण म्हणजे अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणे आहे. आमचे कोणाशीही शत्रूत्व नाही, पण जो कोणी सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करेल, त्यांना हिशोब द्यावा लागेल"

"जर कोणी आमच्या भावाला मारले तर आम्ही नक्कीच प्रतित्युत्तर देऊ. जय श्री राम जय भारत", असं बिश्नोई गँगने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली. आहे तर आणखी एकाचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना झाली आहेत. या हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासे होत असून २ लाखांची सुपारी घेऊन ही भयंकर हत्या करण्यात आल्याचे आता समोर आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चारही आरोपी कुर्ला परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. घराचे भाडे १४ हजार रुपये इतके होते. हत्येच्या सुपारीतून चौघांनीही प्रत्येकी ५० हजार रुपये वाटून घेतले होते. पंजाबमधील जेलमध्ये असताना आरोपी एकमेकांच्या संपर्कात आले. या हत्येसाठी कुरियरद्वारे मारेकऱ्यांना पिस्तूल सोपवण्यात आले. विशेष म्हणजे आरोपींनी जवळपास एक महिन्यांपासून बाबा सिद्दीकी यांच्या घराची तसेच कार्यालयाची रेकी केली होती.


सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT