T20 World Cup : दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा पराभव भोवणार, तिघांपैकी कुणाची विकेट पडणार? टीम इंडियात मोठा उलटफेर होणार

india playing eleven change vs zimbabwe t20 world cup : दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकानं तसे कठोर संकेत दिले आहेत. तीन फलंदाज निशाण्यावर असून, त्यापैकी एकाची विकेट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टीम इंडियात मोठा फेरबदल होणार, ३ पैकी एका फलंदाजाची विकेट पडणार
Abhishek Sharma, Tilak Verma Rinku Singh Sanju Samson Team Indiasaam tv
Published On

टी २० वर्ल्डकपच्या सुपर ८ फेरीत दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर खराब फॉर्म असलेल्या फलंदाजांचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टीम इंडियाचे असिस्टंट कोच रेयान टेन डॉएश आणि बॅटिंग कोच सितांशू कोटक यांनी कठोर संकेत दिले आहेत. त्यामुळं तीनपैकी कोणत्या एका फलंदाजाला डच्चू मिळेल, याबाबत चर्चा सुरू आहे.

टीम इंडियाचे सुपर ८ मधील पुढील दोन सामने अत्यंत महत्वाचे आहेत. टीम इंडियाचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिंकू सिंह, तिलक वर्मा किंवा अभिषेक शर्मा या तिघांपैकी एका फलंदाजाला पुढील सामन्यात बाहेर बसवले जाऊ शकते, असे संकेत प्रशिक्षकांनी दिले आहेत. या तिन्ही फलंदाजांनी आतापर्यंत एकाही सामन्यात मोठी धावसंख्या उभारली नाही.

टीम इंडियात बदलाची शक्यता

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, टीम इंडियाचे बॅटिंग कोच सितांशू कोटक म्हणाले की, हेड कोच गौतम गंभीर आणि टीम मॅनेजमेंटला वाटलं तर काही बदल करावे लागले तर ते करू. जर काही बदल करावा लागला तर तो काय असेल, याबाबत आता विचार सुरू झाला आहे. यावेळी त्यांनी अभिषेक शर्माच्या खराब फॉर्मवरही भाष्य केले आहे.

कोटक यांनी अभिषेक शर्माबाबत महत्वाचं विधान केलं आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक सल्ले देण्याऐवजी त्याला मोकळीक द्यायला हवी. दोन दिवसांत काही बदलू शकत नाहीत. आवश्यकतेपेक्षा जास्त सल्ले दिल्याने त्याचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्याला चेंडूचा अंदाज घेऊन चांगलं खेळावं लागेल, असे कोटक म्हणाले. मात्र, पुढील सामन्यात अभिषेक शर्माला संधी मिळते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टीम इंडियात मोठा फेरबदल होणार, ३ पैकी एका फलंदाजाची विकेट पडणार
T20 World Cup : सुपर ८ सामन्यांवेळी पाऊस पडला, तर गोंधळात पडू नका! ICC चे नियम जाणून घ्या

संजू सॅमसनचं कमबॅक ?

टीम इंडियामध्ये बॅकअपला स्पेशालिस्ट फलंदाजांची कमतरता आहे. हा एक चिंतेचा विषय आहे, अशी कबुली टेन डॉएश यांनी दिली. मागील दीड वर्षात ज्या फलंदाजानं चांगली कामगिरी केली आहे, त्या खेळाडूची निवड केली जाऊ शकते. संजू सॅमसन हा चांगला फलंदाज आहे. टॉप ऑर्डरमध्ये उजव्या हाताने फलंदाजी करणारा खेळाडू असल्यानं त्याची मदत होऊ शकते. पुढील दोन्ही महत्वाच्या सामन्यांआधी सॅमसनला संघात घेण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

टीम इंडियात मोठा फेरबदल होणार, ३ पैकी एका फलंदाजाची विकेट पडणार
T20 World Cup : अभिषेक शर्माची वर्ल्डकपमधून सुट्टी? सूर्यकुमार यादवच्या वक्तव्यानं चर्चेला जबरदस्त तडका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com