Amol Mitkari Reaction on Baba Siddique Death
Amol Mitkari Reaction on Baba Siddique DeathSaam TV

Baba Siddique Death : ...तर बाबा सिद्दिकी यांचा जीव वाचला असता; अजितदादांचा नेता गृहखात्यावर संतापला

Amol Mitkari Reaction on Baba Siddique Death : बाबा सिद्धिकी यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर अमोल मिटकरी यांनी गृहखात्यावर ताशेरे ओढले.
Published on

अक्षय गवळी, साम टीव्ही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी वांद्रे परिसरात बाबा सिद्धीकी यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. या घटनेवर अजितदादा गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी चांगलाच संताप व्यक्त करत गृह खात्यावर ताशेरे ओढले. सिद्दिकी यांची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी जर मुंबई पोलिसांनी गांभीर्याने घेतली असती तर त्यांचा जीव वाचला असता, असं आमदार मिटकरी म्हणाले. गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक करून चालणार नाही, घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी देखील मिटकरी यांनी केली.

Amol Mitkari Reaction on Baba Siddique Death
Baba Siddique News : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे ‘या’ गँगचा हात; खळबळजनक माहिती समोर

बाबा सिद्धिकी यांच्या मृत्यूच्या घटनेवर दु:ख व्यक्त करताना अमोल मिटकरी म्हणाले, "अजितदादांच्या हक्कांचा आणि विश्वासाचा मित्र पक्षाने गमावला आहे. सिद्दिकी यांच्या हत्येची घटना फार दुर्दैवी आहे. जीविताला धोका असल्याची सूचना त्यांना १५ दिवसांआधी आली होती. तेव्हापासून ते सुरक्षा पुरवण्यासाठी मागणी करीत होते. मात्र, सुरक्षा न पुरवल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली, असा थेट आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला.

पुढं बोलतांना मिटकरी म्हणाले, "तीन आरोपी येतात तोंडाला रुमाल बांधतात आणि त्यांच्यावर गोळीबार करतात. साधारण व्यक्तीची हत्या होणं आपण समजू शकतो. मात्र, सुरक्षा असलेल्या व्यक्तीची भरदिवसा गोळीबार करून हत्या होतेय हा गृहखात्याचा निष्काळजीपणा आहे का? गृह खात काय करत होतं?" असा सवालही आमदार मिटकरींनी उपस्थित केला. तसेच या घटनेला मुंबई पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला.

"सिद्दिकी यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या मागणीची जर मुंबई पोलिसांनी गांभीर्य घेतली असती तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. मात्र सिद्दिकी यांच्या मृत्यूची घटना राष्ट्रवादी पक्षासाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. बाबा सिद्दिकी हे अभिनेता सलमान खान यांच्या अगदी जवळचे होते. बिश्नोई गँगकडून त्यांना धमक्या येत होत्या, त्याच पद्धतीने काही आहे का? असा संशय पोलिसांना आहे". त्या दिशेने देखील पोलिसांचा तपास सुरू केला असल्याचं मिटकरी म्हटले.

Amol Mitkari Reaction on Baba Siddique Death
Baba Siddique Death : हीच ती जागा, जिथे बाबा सिद्धीकींवर झाला गोळीबार; थरारक VIDEO आला समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com