Mumbai Pune Expressway Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway Accident : देशाच्या 'समृद्धी'चं प्रतीक असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ठरतोय मृत्यूचा सापळा

Mumbai Pune Expressway Accident: गेल्या काही दिवसांपासून येथे अपघाताच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

Ruchika Jadhav

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्ग हा एकेकाळी प्रगतीचं आणि विकासाचं एक प्रतीक म्हणून ओळखला जात होता. या महामार्गाने वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचवता येत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे अपघाताच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. (Latest Accident News)

अशात उपाय म्हणून शासनाकडून काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र तरी देखील अपघाताचे प्रमाण थांबता थांबत नाहीये. आजवर मुंबई-पुणे महामार्गाने शेकडो व्यक्तींचा जीव घेतला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हा भारतातील पहिला ६-लेन एक्स्प्रेस वे आहे.

शेकडो व्यक्तींनी गमावला जीव

मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Express Way) आजवर शेकडो व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. या महामार्गावर अनेक व्यक्ती वाहनांची वेग मर्यादा पाळत नाहीत. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. साल २०२२ पासून आतापर्यंत ५४ हून अधिक अपघात झाले आहेत. महामार्गावरील फक्त ४ मुख्य ठिकाणी झालेल्या अपघाताची ही आकडेवारी आहे.

प्रवासात अनेक नागरिक वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवतात. घाईमध्ये एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी समोर असलेल्या वाहनाला कट मारून निघून जातात. असे केल्याने अपघात होण्याची शक्यता असते. तसेच वेगात वाहन चालवणे, महामार्गावर जास्त प्रमाणात अवजड वाहने चालवणे, वाहन चालवताना दुसरीकडे लक्ष जाणे या सर्वांमुळे अपघाताच्या घटना सातत्याने वाढत आहेत. वाहनांचे ब्रेक फेल झाल्यानेही काही अपघात घडले आहेत.

अपघाताचे वाढते प्रमाण टाळण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग (Expressway) प्राधिकरणाने नागरिकांनी सर्व नियम निट पाळण्यासाठी काही पाऊले उचलली आहेत. यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या कडेला दिवे लावणे, वेगवेगळ्या दिशेची चिन्हे, सूचना फलक, सुरक्षा अडथळे, पादचारी रक्षक रेलिंग, क्रॉसरोड्सवर स्पीड हंप, रंबल स्ट्रिप्स इत्यादी सुविधा देण्यात आल्यात. मात्र तरी देखील अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने मुंबई-पुणे महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT