Lalbaugcha Raja Visrajan  x
मुंबई/पुणे

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी डावललं, कोळी बांधवांचा आरोप; मंडळाकडून मोठं वक्तव्य, सांगितलं...

Lalbaugcha Raja Visrajan : लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही झालेले नाहीये. मूर्तीच्या तराफ्याच्या मुद्द्यावरुन कोळी बांधवांनी लालबागचा राजा मंडळावर आरोप केला आहे.

Yash Shirke

  • लालबागच्या राजाचं विसर्जन भरतीमुळे विलंबित झालं आहे.

  • कोळी बांधवांनी मंडळावर डावलण्याचा आरोप केला.

  • मंडळाने लवकरच मूर्तीचं विसर्जन होईल असं सांगितलं.

Lalbaugcha Raja Ganapati Visrajan : मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लोकप्रिय असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही झालेलं नाही. काल (६ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला होता. रात्री उशिरा तो गिरगाव चौपाटीवर पोहोचला. नव्या तराफ्यावर विसर्जनासाठी मूर्ती चढवण्यात आली. पण भरतीमुळे समुद्राचे पाणी वाढल्याने लालबागचा राजा अजूनही विसर्जित झालेला नाही.

लालबागचा राजा काल विसर्जनसाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाला. चौपाटीवर भरतीमुळे मूर्तीचे विसर्जन झालेले नाही. यंदा नव्या तराफ्यावरुन लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येणार आहे. भरतीच्या वेळेचा अंदाज न आल्याने गणरायाच्या विसर्जनाला थोडा विलंब झाला आहे. याबाबत गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांच्याशी साम टीव्हीने संवाद साधला.

हिरालाल वाडकर म्हणाले, 'आज गिरगाव चौपाटीमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं नाही. काही कारणांमुळे ओहटी भरतीचा अंदाज लालबागचा राजा मंडळाला आलेला नाही. आम्ही वाडकर बंधू बरीच वर्ष झाली लालबागच्या राज्याचं विसर्जन करत आलेलो आहोत. आज काही कारणांमुळे विसर्जन लवकर झालेलं नाही. वाडकर बंधू वर्षानुवर्ष लालबागच्या राजाचं विसर्जन करत होते. पण आता ते करत नाहीत. कारण गुजरातचा तराफा आल्याने त्याचं कंत्राट लालबागचा राजा मंडळाने त्यांना दिलं आहे. त्यामुळे यापुढे लालबागचा राजा मंडळाने विसर्जनाची काळजी घ्यायला हवी.'

'अनेक वर्ष कोळी बांधव आमच्यासोबत विसर्जनात सहभागी होतात. बधवार पार्कमधली कोळी बांधवांसोबत आम्ही संवाद साधला. त्याचं मत आहे की, साडेदहा ते अकराच्या सुमारास तराफा समुद्रात जाईल आणि तेव्हा लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. ओहटीच्या वेळी लालबागचा राजा रथावरुन तराफ्यावर घेतो आणि मग तराफा गिरगाव चौपाटीमध्ये जाऊन मग राजाचं विसर्जन होतं. आज उशीर झाल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो', असे सुधीर साळवी, लालबागचा राजा मंडळाचे सचिव यांनी म्हटले आहे.

२४ तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही लालबागच्या राजाचे विसर्जन झालेले नाहीये. गिरगाव चौपाटीवर जमलेल्या सर्व भाविकांसह गणेश मंडळांचे कार्यकर्तेही चिंताग्रस्त झाले आहेत. भरतीचा अंदाज घेत लालबागच्या राजाचे विसर्जन केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच मूर्तीचे विसर्जन होऊ दे अशी प्रार्थना भक्तगण करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच बहरेल प्रेम; 'या' राशींच्या जीवनात प्रेमासह धनलाभाचे योग, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला अटक करा, अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मैदानात काय घडलं?

भाजपला मतदान करणं भोवलं; MIM च्या नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी, आता पदही जाणार

ठाकरे बंधूंना मोठा धक्का, शरद पवारांची राष्ट्रवादी भाजप-शिंदेसेना महायुतीसोबत

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील जाखले गावातील विहिरीत दोन बिबटे पडले

SCROLL FOR NEXT