Labor Two Time Attempts Killed Himself  
मुंबई/पुणे

Mumbai News: बापरे! आत्महत्येचा दोनदा प्रयत्न; १३ व्या मजल्यावरून कामगाराची उडी,थरकाप उडणारा व्हिडिओ व्हायरल

Labor Two Time Attempts Killed Himself: बिरजूप्रसाद रमेश बनरवा असे या कामगाराचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मानसीक तणावात होता. त्यातून तो आत्महत्येचा प्रयत्न करत होता.

Bharat Jadhav

मयूर राणे , साम प्रतिनिधी

इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या एका कामगाराचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. मानसिक तणावात असलेल्या ने हा कामगार आत्महत्या करत असल्याची माहिती समोर आलीय. हा व्हिडिओ विक्रोळीतील कन्नमवार येथील आहे. विशेष म्हणजे १३ व्या मजल्यावरून उडी मारुनही हा कामगार सुखरूप आहे. विशेष म्हणजे या कामगाराने एक नाही तर आत्महत्येचे दोनदा प्रयत्न केले. परंतु दोन्ही वेळेस त्याला कोणतीच इजा झाली नाही. या घटनेमुळे देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीची प्रचिती झालीय.

विक्रोळीच्या कन्नमवार नगर भागात निर्माणाधीन असलेल्या ५७ क्रमांकाच्या इमारतीवरून उडी मारून एक कामगार आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. हा कामगार १३ व्या मजल्यावरून उडी मारून संपवण्याच्या विचारात होता. परंतु देवाला त्याला तारायचं होतं. त्यामुळे दोनवेळा इमारतीवरून उडी मारूनही हा कामगार सुखरुप आहे. या कामगाराने आधी १३ व्या मजल्यावरून त्याने उडी मारली पण सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यांमध्ये अडकला. त्यामुळे तो सुरक्षित राहिला.

बिरजूप्रसाद रमेश बनरवा, असे या कामगाराचे नाव आहे. आत्महत्या करण्याच्या प्रयत्नातून बचावल्यानंतर त्याला त्याच्या उत्तरप्रदेशमधील गोरखपूर गावी पाठविण्यात आले आहे. तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. काल तो काम करीत असलेल्या ५७ क्रमांकाच्या इमारतीच्या तेराव्या मजल्यावर गेला तिथून त्याने खाली उडी मारली. परंतु तो आठव्या मजल्यावर लावण्यात आलेल्या जाळीत अडकला. तिथून ही त्याने उडी मारली तर तिसऱ्या मजल्यावरील जाळीत अडकला. तिथून उडी मारल्यावर खाली लोकांनी पकडलेल्या जाळीत पडला आणि वाचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT