Nalasopara: परफ्युमच्या बाटल्यांचा तारखा बदलत होते, अचानक घरात झाला मोठा स्फोट

Nalasopara Gas Leak News: नालासोपारा पूर्वच्या शंकेश्वरनगरमधील एका इमारतीत परफ्युमच्या बाटल्यांच्या तारखा बदलण्याचे काम सुरू असताना स्फोट झालाय. यात एकाच कुटुंबातील ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Nalasopara News
Nalasopara NewsSaam Tv News
Published On

नालासोपारा पूर्वच्या शंकेश्वरनगरमधील एका इमारतीत परफ्युमच्या बाटल्यांवरील तारखा बदलण्याचे काम सुरू असताना स्फोट झालाय. एक कुटुंब परफ्युम बाटलीवरील तारखा बदलण्याचं काम करीत होते. मात्र, अचानकपणे स्फोट झाला. यात घरातील ४ जण होरपळून जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. परफ्युममध्ये असलेल्या गॅसमुळे स्फोट झाल्याची माहिती आहे.

नालासोपारा पूर्वच्या शंकेश्वरनगरमधील एका इमारतीत ही धक्कादायक घटना घडली. याच ठिकाणी रोशनी अपार्टमेंट आहे. याच इमारतीच्या ११२ क्रमांकाच्या सदनिकेत वडर कुटुंब राहते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हे कुटुंब परफ्युम बाटलीवरील तारखा संपल्यामुळे बदलण्याचे काम करीत होते. याचदरम्यान अचानकपणे स्फोट झाला आणि एकाच कुटुंबातील ४ जण होरपळून जखमी झाले आहेत.

Nalasopara News
Shocking Video: आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, नंतर लिंग बदलतात; ट्रान्सजेंडर टोळीची दहशत, पाहा धक्कादायक VIDEO

यात महावीर वडर(वय वर्ष ४१) सुनीता वडर, हर्षवर्धन वडर(वय वर्ष ९), हर्षदा वडर(वय वर्ष १४) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

Nalasopara News
Minor Girls Escape: खिडकीच्या जाळ्या तोडून ८ मुलींनी ठोकली धूम, शासकीय निरीक्षणगृहातील मुली पळाल्या

मुलगा हर्षवर्धन याच्यावर नालासोपारा येथील खासगी रुग्णालय तर अन्य तीन जणांवर दुसर्‍या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणानंतर शेजारील नागरीक भयभीत झाले असून, परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेचा तपास केला जात असून, नेमका स्फोट कशामुळे झाला, अन्य काही कारण आहे का? याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com