Kurla BEST Bus Accident Update Saam Tv
मुंबई/पुणे

Kurla BEST Bus Accident: बसमध्येच काही तरी फॉल्ट असेल, कुर्ला बेस्ट अपघातातील आरोपीच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

Kurla Accident Update: आरोपी बस चालक संजय मोरे यांच्या पत्नी मनीषा मोरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी थेट बसमध्ये फॉल्ट असेल असे मत व्यक्त केले आहे.

Priya More

मयूर राणे, मुंबई

कुर्ला पश्चिमेला सोमवारी रात्री बेस्ट बसला भीषण अपघात झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली. भरधाव बेस्ट बस थेट मार्केटमध्ये घुसली. भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू तर ४९ जण जखमी झालेत. जखमींवर सध्या भाभा आणि सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आरोपी चालक संजय मोरे सध्या पोलिस कोठडीत आहे. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अशामध्ये आरोपी बस चालक संजय मोरे यांच्या पत्नी मनीषा मोरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

कुर्ला बस दुर्घटनेतील आरोपी संजय मोरेला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकीलांनी ७ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली होती. आरोपीने आमली पदार्थांचे सेवन केले होते का? तसेच त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले होते का? यासोबतच साक्षीदारांची साक्ष नोंदवणे अजून बाकी असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. आरोपीच्या वकिलाने युक्तिवाद करत संजय मोरेची मेडिकल टेस्ट झाली असून बेस्ट प्रशासनाकडे त्याच्या प्रशिक्षणासंदर्भात पत्र व्यवहार केला जावा यासाठी पोलिस कोठडीची गरज नसल्याचे कोर्टाला सांगितले. अखेर न्यायमूर्ती गौर गौड यांनी आरोपी संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरेची पत्नी मनीषा मोरे यांनी सांगितले की, 'त्यांच्याकडून जे काय झालं ते आम्हाला कोणालाच काही माहिती नव्हतं. माझ्या नवऱ्याने जवळजवळ ३० ते ३५ वर्ष ड्रायव्हिंगचे काम केले आहे. जुना कंपनीमध्ये त्यांनी अनेक चांगल्या फोर व्हिलर चालवल्या. माझ्या नवऱ्याचा बेस्ट बॅच देखील खूप जुना आहे. माझ्या नवऱ्याने बेस्टमध्ये छोट्या बस ३ वर्षे चालवल्या आहेत.'

संजय मोरे यांनी पहिल्यांदाच बस चालवल्याचा आरोप केला जात आहे त्यावर त्यांनी सांगितले की, 'या मोठ्या बसची त्यांना ट्रेनिंग दिल्या आहेत. त्याच्यानंतर १ डिसेंबरपासून ते जॉईन झालेत. काल गाडी हातात घेतली आणि ठोकली असं काहीही विषय नाही. उगाच त्यांच्या नावाची बदनामी करू नका. माझा माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे. माझा नवरा कोणतीच गाडी ठोकू शकत नाही आणि कोणाचे नुकसान करू शकत नाही. जे झालं त्याबद्दल मी माफी मागते. असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं. ते मुद्दाम असं काही करू नाही शकत.'

बसमध्ये काही तरी फॉल्ट असेल असं मत व्यक्त करत मनिषा मोरे म्हणाल्या, 'त्यांना गाडी कंट्रोल झाली नसेल. गाडीमध्ये काही तरी फॉल्ट असेल. ते बोलत आहेत मी गाडी ट्राय करत होतो. गाडी चेक करून माझे मिस्टर गाडीमध्ये चढतात. तिथे फोटो काढलेला असतो वहीमध्ये लिहिलेले असते. गाडीमध्ये काही तुटलंय फुटलंय याचा आधी फोटो काढून घेतला जातो. त्यानंतरच गाडी चालवली जाते. कामावर गेल्यानंतर माझ्या नवऱ्याने बसचा एक राऊंड केला होता. दुपारची शिफ्ट होती त्यांची. माझ्या नवऱ्याने त्याच्यानंतर लास्टच्या राउंडला असं झालं म्हणजे गाडीमध्ये काहीतरी असू शकतं.'

तसंच, 'माझा नवरा एवढ्या स्पीडला गाडी चालवत नाही. गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार त्याच्यामुळे त्या बसवरील त्याचा ताबा सुटला असेल. माझ्या नवऱ्यावर माझा खूप विश्वास आहे. आमची भांडणं असं काही झालेले नाही आणि टेन्शनमध्ये आम्ही माणसं घराबाहेर पाठवत नाही. आम्ही आमची माणसं व्यवस्थितच घराबाहेर पाठवतो. टेन्शनमध्ये असतील तर जाऊन देत नाही.', असं त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT