कुर्लामध्ये बेस्ट बसला भीषण अपघात झाला होता. भरधाव बसने अनेक वाहनांना धडक दिली होती. या अपघातामध्ये अनेक जण चिरडले गेले होते. या अपघातामध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर ४२ जण जखमी झाले होते. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अशामध्ये अपघाताचा आणखी एक धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. हा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून अपघात किती भीषण होता हे लक्षात येत आहे.
कुर्ला बेस्ट अपघाताचा आणखीन एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ऐन गर्दीत रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडत बस पुढे गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. अनेक रिक्षा आणि दुचाकींना बसने धडक दिली. अपघातानंतर रस्त्यावर हाहाकार झाला. सर्वांची पळापळ झाली. अपघातात आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू तर ४२ जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या सायन, भाभा रुग्णालयासह अनेक खासगी रुग्णालयात देखील उपचार सुरू आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
कुर्ला बस अपघात प्रकरणाचा अहवाल अद्यापही प्रतिक्षेत आहे. कुर्ला बस अपघात प्रकरणावर ५ सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. ही समिती घटनेची माहिती आणि तपास करुन अहवाल सादर करणार आहे. सध्या बेस्ट बस चालक संजय मोरेला पोलिसांनी अटक केली असून कोर्टाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. घटनेला ३ दिवस उलटल्यानंतरही अहवालाची अजूनही प्रतिक्षा आहे. पुढील १० दिवसांत अहवाल सादर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कुर्ला अपघात प्रकरणात बसमधील सीसीटीव्ही ताब्यात आल्यानंतर २५ जणांचा जबाब नोंदवण्यात आला. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी पोलिसांनी बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर जप्त केला. त्यातील चित्रिकरणाच्या आधारे अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कुर्ला अपघात प्रकरणी आतापर्यंत २५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. प्रवासी, प्रत्यक्षदर्शी, जखमी, बेस्ट कर्मचारी आणि परिवहन अधिकारी यांचे जबाब नोंदवण्यात आले. अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणारे प्रवासी हे प्रत्यक्षदर्शी असून त्यांचा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.