Mumbai Kurla Bus Accident : त्या 30 सेकंदात परिस्थिती हाताबाहेर गेली; अपघातग्रस्त बसमधील CCTV पाहा

Mumbai Kurla Bus Accident CCTV : कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्या आतला व्हिडिओ समोर आला आहे. या बेस्ट बेसच्या आतील व्हिडिओमध्ये प्रवासी घाबरून गेले होते.
 त्या 30 सेकंदात परिस्थिती हाताबाहेर गेली; अपघातग्रस्त बसमधील CCTV पाहा
Mumbai Kurla Bus Accident Saam tv
Published On

मुंबई : मुंबईतील कुर्ला अपघाताचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईच्या कुर्ला येथे झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या भरधाव बेस्ट बसने रस्त्यावरील ३० हून अधिक जणांना चिरडलं. आता या बेस्ट बसच्या आतील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या बसमधील प्रवाशांनी मोठ्या शिताफीने जीव वाचवला. या अपघाताचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्लाच्या बुद्ध कॉलनीजवळ सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात ७ जणांनी जीव गमावला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. बेस्ट बसच्या या भीषण अपघात निष्पाप लोकांचे बळी गेले. बेस्ट बस चालकाने गाडीवरील नियंत्रण गमावलं. त्यानंतर या बसच्या चालकाने रस्त्यावर उभे चालणाऱ्या लोकांना चिरडलं.

या अपघातात रस्त्यावरील सर्वसामान्य लोकांना जीवाला मुकावं लागलं. या प्रकरणातील बेस्ट बस चालकाला कोर्टाने ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या भीषण अपघातानंतर घटनास्थळी एकच धावाधाव सुरु झाली. या भीषण अपघातग्रस्त बसच्या आतला सीसीटीव्ही व्हिडिओ हाती आला आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या कुर्ला बुद्ध कॉलनीजवळ बेस्ट बसचा सोमवारी रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. ही बेस्ट बस प्रवाशांनी खचून भरलेली होती. या अपघातग्रस्त बेस्ट बसच्या आतील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या बसच्या अपघाताआधी कंडक्टर शांतपणे तिकीट काढायचे काम करत होता.

बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. या गर्दीतच कंडक्टरचे तिकीट काढणे सुरु होते. या सीटीव्हीव्हीमध्ये सुरुवातीच्या ३० सेकंद आधी काही घडले नव्हते. पण त्यानंतर या बेस्ट बसचा अचानक वेग वाढला. त्यानंतर ही बस थेट एका कमानीला धडकली. यावेळी या बसने रस्त्यावरील उभे असणाऱ्या लोकांना चिरडले.

 त्या 30 सेकंदात परिस्थिती हाताबाहेर गेली; अपघातग्रस्त बसमधील CCTV पाहा
Kurla Bus Accident : कुर्ला बस अपघात प्रकरण; संजय मोरेचा कबुली जबाब, केला धक्कादायक खुलासा|VIDEO

बेस्टची भरधाव बस कमानीला धडकून थांबली. या अपघाताने बसमधील प्रवासी घाबरून गेले. त्यानंतर बसमधील प्रवासी घाईघाईत दरवाजातून बाहेर पडू लागले. तर काही खिडकी फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. अवघ्या मिनिटात बसमधील सर्व प्रवासी बसमधून उतरले. या अपघातानंतर घाबरलेला बस चालक आणि कंडक्टरनेही पळ काढला.

 त्या 30 सेकंदात परिस्थिती हाताबाहेर गेली; अपघातग्रस्त बसमधील CCTV पाहा
Kurla Accident: क्लच समजून चुकून 'एक्सिलेटर' दाबला, अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं? आरोपी चालकानं सर्वकाही सांगितलं...
 त्या 30 सेकंदात परिस्थिती हाताबाहेर गेली; अपघातग्रस्त बसमधील CCTV पाहा
Kurla BEST Bus Accident: बसमध्येच काही तरी फॉल्ट असेल, कुर्ला बेस्ट अपघातातील आरोपीच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

पोलिसांकडून तपास सुरु

बसमधून उतरल्यानंतर बसचा चालक आणि कंडक्टर स्थानिक लोकांच्या तावडीत सापडला. या अपघातानंतर स्थानिक लोक या चालकाला मारहाण करू लागले. तसेत स्थानिक लोक कंडक्टरलाही मारहाण करू लागले. लोकांकडून मारहाण सुरु असताना पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिसांनी या चालक आणि कंडक्टरला लोकांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केले. त्यानंतर कोर्टाने बेस्ट बस चालकाला ११ दिवसांची कोठडी सुनावली. आता या प्रकरणाचा आणखी तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com