Krishnaraaj Mahadik-Rinku Rajguru Saam tv
मुंबई/पुणे

Krishnaraaj Mahadik-Rinku Rajguru : 'आम्ही ठरवूनच भेटलो होतो, पण...'; कृष्णराज महाडिकांनी सांगितलं भेटीमागचं सिक्रेट

Krishnaraaj Mahadik-Rinku Rajguru latest news : कृष्णराज महाडिक यांनी अभिनेत्री रिंकू राजगुरुसोबतच्या भेटीमागचं सिक्रेट सांगितलं आहे. यावेळी कृष्णराज महाडिक यांनी आर्चीसोबतच्या लग्नाच्या चर्चाही फेटाळून लावल्या आहेत.

Vishal Gangurde

खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांचा 'सैराट' फेम, अभिनेत्री रिंकू राजगुरुसोबतचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दोघांच्या एकत्र फोटोमुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कृष्णराज आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू या दोघांची कोल्हापुरात भेट झाली होती. कोल्हापुरात श्री महालक्ष्मी मंदिराजवळील भेटीचं सिक्रेट कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं आहे.

कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं की, 'आम्ही ठरवून भेटलो होतो. आम्ही मंदिरात दर्शनासाठी एकत्र गेलो होतो. त्या फोटोमागचा अर्थ वेगळा काढला जात आहे. मागच्या व्लॉगमध्ये माझ्या लग्नाची चर्चा झाली होती. त्यामुळे काही लोकांना वाटत असेल. आम्ही चांगले मित्र आहोत. त्या पलीकडे आमच्यात काही नाही. मी सर्वांना विनंती करतो की, तुम्ही तसं काही समजू नका'.

कृष्णराज यांचा व्लॉग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यात त्यांचे वडील म्हणतात की, २०२५ मध्ये यंदा कर्तव्य आहे'. त्यावर कृष्णराज महाडिक म्हणतात की, 'दोन मोठे भाऊ आहेत. त्यांचं लग्न झालं आहे. त्यामुळे तिसऱ्या मुलावर दबाव आहे. त्या गोष्टी चालत राहतात. याबाबत कुटुंबात चर्चा झालेली नाही. व्लॉगमध्ये ते बोलून गेले, त्यानंतर तो बातमीचा विषय झाला. माझं लग्न कधी होणार, केव्हा होणार, याबाबत मला काही माहिती नाही,असेही कृष्णराज यांनी सांगितलं.

कोण आहेत कृष्णराज महाडिक?

भाजप खासदार धनंजय महाडिक यांना तीन मुले आहेत. पृथ्वीराज महाडिक आणि विश्वराज महाडिक हे दोन मुले आहेत. कृष्णराज महाडिक हे त्यांच्या तिसऱ्या मुलाचे नाव आहे. ते एक युट्यूबर आहेत. krish Mahadik असे त्यांच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT