Pune Koyta Gang crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Koyta Gang : आम्हीच इथले भाई, पुण्यात कोयता गँगचा राडा; भर रस्त्यात कोयते उगारुन लोकांवर दगडफेक

Pune Koyta Gang crime : पुण्यात कोयता गँगचा पुन्हा एकदा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. कोयता गँगने भर रस्त्यात कोयते उगारुन लोकांवर दगडफेक केली आहे.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : पुण्यात कोयता गँगचा नंगानाच सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील हडपसर भागातील रामटेकडी परिसरात टोळक्याने कोयते उगारून दगडफेक केल्याची घटना घडली आहे. आम्ही इथले भाई, असं म्हणत या कोयता गँगने परिसरात दहशत माजवली आहे. या टोळक्याने केलेल्या दगडफेकीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर भागातील रामटेकडी परिसरात कोयता गँगने राडा केला. आम्हीच इथले भाई, असं म्हणत कोयता गँगने परिसरात धिंगाणा घातला. पुण्यातील टोळक्याने भररस्त्यात दगडफेक केली. या दगडफेकीत दोन महिला जखमी झाल्या. वानवडी पोलिसांच्या हद्दीत संपूर्ण प्रकार घडला. या प्रकरणात पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. कोयता गँगने शनिवारी रात्री साडे अकरा वाजता धुमाकूळ घातला.

पोलिसांनी महेश विकास शिंदे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रेम उर्फ पिट्या थोरात (वय २१), दुर्वेश उर्फ बल्ल्या गायकवाड (वय १८), अरविंद उर्फ नक्या माने (वय १८), नितीन पाटोळे (वय १८), ओंकार देढे (वय २०), चेतन बावरी (वय १९, सर्व रा. रामटेकडी, हडपसर) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या गँगमधील युवकांनी केलेल्या दगडफेकीत नीलावती सतीश देडगे (वय ५०), अनिता विश्वजीत ठोसर (वय ३८) जखमी झाल्या आहेत.

या कोयता गँगविरोधात संतोष छबुराव सुपेकर यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सुपेकरांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे. कोयता गँगने शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रामटेकडी दगडफेक केली. कोयता गँगच्या दगडफेकीनंतर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष सुपेकर आणि त्यांचा पुतण्या गणेश सुपेकर (वय २२) हे शनिवारी रात्री घरासमोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांच्याकडे कोयते होते. त्यांनी परिसरातील घरांवर दगडफेक केली. नागरिकांना शिवीगाळ केली. सुपेकर यांच्याजवळ येऊन तू प्रण्याबरोबर का फिरतो, असे म्हणून दगड आणि हत्याराने मारहाण करुन त्यांना जखमी केले.

'आम्ही इथले भाई आहोत, अशी धमकी देऊन दगडफेक आणि लोखंडी हत्यारे हवेत फिरवत त्यांनी दहशत निर्माण केली. त्यांनी केलेल्या दगडफेकीत निलावती देडगे आणि त्यांची मुलगी अनिता ठोसर यांना दगड लागल्याने त्यात जखमी झाल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

SCROLL FOR NEXT