Pune Koyta Gang News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Koyta Gang : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ, हडपसर परिसरात दुकानांची तोडफोड; व्यापाऱ्यांना धमकावलं

Pune Crime News : पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. हडपसर, फुरसुंगी परिसरात कोयता गँगने धुमाकूळ घालत दुकानांची तोडफोड केली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला का नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. एकीकडे हिट अँड रनची घटना ताजी असतानाच दुसरीकडे शहरात पुन्हा कोयता गँगने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. हडपसर परिसरात शनिवारी (ता. ३१) कोयता गँगच्या गुंडांनी दुकानांची तोडफोड केली आहे.

हातात कोयते घेऊन कोयता गँगच्या गुंडांनी फुरसुंगी भेकराईनगर येथील दुकानांची तोडफोड केली. यावेळी त्यांनी खंडणीसाठी व्यापाऱ्यांना देखील धमकावलं. इतकंच नाही, तर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक देखील केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

या घटनेनं नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण पसरलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा कोयता गँगचे गुंड धिंगाणा घालत दुकानांची तोडफोड करत होते, तेव्हा आम्ही कायद्याला अजिबात घाबरत नाहीत, असं ओरडून सांगत होते. या प्रकारामुळे फुरसुंगीतील रहिवासी सुद्धा हैराण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फुरसुंगीतील भेकराईनगर परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कोयता गँगचे गुंड आले. त्यांनी परिसरात धिंगाणा घालत व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावलं. स्थानिकांच्या माहितीनुसार, गुंडांच्या या टोळक्यामध्ये अभय गायकवाड उर्फ भुऱ्या उर्फ छोटा रावण तसेच त्याचे साथीदार अरविंद उर्फ नक्या अजय माने, गौरव मंडल, विजय बसवराज कुरले, माणिक नागेश सगर उर्फ वाढीव बबल्या यांचा समावेश होते.

Edited by - Satish Daud

कुठलीही भीती न बाळगता हे गुंड हातातील हत्यारे हवेत भिरकावत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना धमकावत होते. व्यापाऱ्यांनी खंडणी दिली नाही म्हणून त्यांनी काही दुकानांची तोडफोड देखील केली. आरोपींनी तेथून जाताना रस्त्यावर असणाऱ्या गाड्यांची तोडफोड केली. तसेच पापडे वस्ती येथील श्री तुकाराम नगरी अपार्टमेंट येथेही सोसायटीत पार्क केलेल्या ७ ते ८ गाड्यांच्या दगड मारून काचा फोडल्या.

दरम्यान, यातील काही गुंड हे अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे अडचणीचे होते, असे पोलिसांकडून वारंवार बोलले जाते. मात्र, याच गोष्टीचा फायदा घेऊन हे गुंड परिसरातील नागरिकांच्या मनात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आतातरी पोलिसांना जाग येणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Pali Bus : कल्याण-डोंबिवली ते पाली एसटी बस सेवा सुरू, प्रवाशांना दिलासा; वेळापत्रक जाणून घ्या

Maharashtra News Live Update: दूषित पाणीपुरवठा विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

Pune Fake Lady Police Arrested: पुण्यात 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश! तरुणीकडून दोन पोलिस गणवेश जप्त

पिंपल्स आणि काळे डाग होतील गायब! ग्लोईंग स्किनसाठी घरीच करा संत्र्याच्या पावडरचा जादुई उपाय

Famous Actress : दिग्दर्शकाचं किळसवाणं कृत्य; प्रसिद्ध अभिनेत्रीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श, घाबरून बॉलिवूड इंडस्ट्री सोडली

SCROLL FOR NEXT