Pune Crime x
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Pune : पुण्यातील कोंढवा भागातील परिसरात एका नराधमाने त्याच्या पोटच्या मुलीवर सलग ४ महिने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Yash Shirke

Pune Crime News : पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पुण्यात एक नराधम त्याच्या अल्पवयीन मुलीवर सलग ४ महिने अत्याचार करत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कोंढवा भागातील काकडेवस्ती या परिसरातील नराधम पित्याने स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर सलग ४ महिने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या आरोपीला गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे, संघटनेच्या महिला पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक यांनी मिळून बेदम चोप दिला.

स्वत:च्या पोटच्या मुलीचे शोषण करणाऱ्या नराधमाला गनिमी कावा संघटना आणि स्थानिक नागरिकांनी मिळून पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या गंभीर प्रकरणी स्थानिक पोलिसांनी नराधम पित्याच्या विरुद्ध पोस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्यात अघोरी विधीच्या नावाखाली महिलेला लुटलं

पुण्यामध्ये एका महिलेला लाखोंचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील सहकारनगरमध्ये राहणारी पीडित महिला जादूटोणा, अघोरी विधी यांच्या बळी पडली. महिलेला ३ लाख १५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका ३६ वर्षीय व्यक्तीच्या विरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fried Modak Recipe: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायासाठी बनवा खुसखुशीत स्वादिष्ट तळणीचे मोदक; वाचा सोपी रेसिपी

Mysterious Fort : सोनं-चांदीने भरलेल्या विहिरी! 'या' किल्ल्यातील गुप्त खजिन्याचं रहस्य आजही कायम

इबोलाचा उद्रेक; मृतांचा आकडा ३,००० च्या पार, WHO ने दिला मोठा इशारा

Kitchen Vastu Tips: घरातील किचनविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होणार, ५ राशींची होणार चांदी; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT