Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?

Maharashtra Political News : शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची बीएमसीकडून परवानगी मिळाली आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेही हजर राहतील असे म्हटले जात आहे.
uddhav thackeray raj thackeray
uddhav thackeray raj thackerayx
Published On

Dasara Melava : छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला परवानगी मिळाली आहे. यामुळे यंदाचा ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील दिसू शकतील असा अंदाज वर्तवला जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये याच संबंधित चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाने शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी जानेवारी २०२५ मध्ये महानगरपालिकेकडे परवानगी मागितली होती. दसऱ्याला आता काहीच दिवस उरले असताना बीएमसी प्रशासनाने ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा अजून या वर्षीही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडणार आहे.

uddhav thackeray raj thackeray
मनोज जरांगेंची मोठी मागणी मान्य, सरकारकडून 9 कोटी 60 लाख रूपयांची मदत, वाचा सविस्तर

जानेवारी २०२५ मध्ये ठाकरे गटाने शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठी बीएमसी प्रशासनाकडे परवानगीचा अर्ज केला होता. परवानगीबाबत ठाकरे गटाने जवळपास तीन वेळा महापालिकेला स्मरणपत्र देखील पाठवले होते. पालिकेकडून उत्तर येत नसल्याचे म्हटले जात होते. आता महानगरपालिकेने अर्जाला हिरवा कंदील दिल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या दसरा मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसू शकतात असेही म्हटले जात आहे.

uddhav thackeray raj thackeray
Satara Gadget: पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी खुशखबर, हैदराबादनंतर सातारा गॅझेट्ससाठी हालचालींना वेग

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-मनसे यांच्यातील युतीची घोषणा कधी करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे देखील मेळाव्याला उपस्थित राहू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज यांना मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते असाही अंदाज वर्तवला जात आहे. आज (१० सप्टेंबर) दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर या संबंधित घोषणा होईल असे म्हटले जात आहे.

uddhav thackeray raj thackeray
Donald Trump : भारतावर 100% टॅरिफ लावा... मोदींना मित्र म्हणवणाऱ्या ट्रम्पने पाठीत खंजीर खुपसला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com