Kolhapur Grandmother from Powai Hostage Case Saam
मुंबई/पुणे

'शुटिंग करायचं सांगून खोलीत नेलं अन्..' १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहितनं नेमकं काय केलं? कोल्हापूरच्या आजीबाईंनी सांगितला थरार

Kolhapur Grandmother from Powai Hostage Case: पवईतील स्टुडिओमध्ये रोहित आर्यानं १७ मुलांना ओलीस ठेवलं होतं. ओलीस ठेवलेल्या मुलांमध्ये आजीबाई आणि त्यांची नातही होती.

Bhagyashree Kamble

पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवलेल्या प्रकरणानंतर मुंबई हादरली. रोहित आर्यानं तब्बल १७ मुलांना ओलीस ठेवलं होतं. त्यांची सुटका करण्यात आली. सुटका करण्यापूर्वी त्यानं व्हिडिओ शूट करून मागणी स्पष्ट केली. मात्र, रोहित आर्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, १७ मुलांमध्ये कोल्हापूरहून आलेल्या मंगल पाटणकर या आजी आणि त्यांची नातही सोबत होती. मंगल पाटणकर आपल्या नातीसह ऑडिशनसाठी स्टुडिओमध्ये आल्या होत्या. मंगल पाटणकर यांच्यासह काही मुलांना एका खोलीत डांबून ठेवलं होतं. या घटनेच्यावेळी उपस्थित असलेल्या मंगल पाटणकरांची सुटका झाल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी त्यांनी साम टिव्हीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्याक्षणी नेमकं काय घडलं? याबाबत त्यांनी माहिती दिली.

मंगल पाटणकर यांनी सांगितलं की, 'ऑडिशनसाठी बोलावून घेतलं. त्यामुळे कोल्हापूरहून मुंबईत आले. ऑडिशन घेतल्यानंतर दोन दिवसांनी शुटिंग केली जाईल, असं त्यानं सांगितलं. आमच्यासोबत रोहित चांगलं बोलत होता. काल त्यानं एक वेगळाच प्रकार केला. एका रूममध्ये ठेवलं. शुटिंग करणार असल्याचं त्यानं सांगितलं' , अशी माहिती मंगल पाटणकर यांनी दिली.

'कोल्हापूरच्या शाळेतर्फे आम्ही ऑडिशनला गेलो होतो. तेथील एका शाळेत माझी नात शिकत आहे. त्यांनी आम्हाला ऑडिशनला जाण्यास सांगितले. शाळेनं पाठवल्यामुळे आम्ही विश्वास ठेवला आणि ऑडिशनला गेलो. मुलांच्या ऑडिशनसाठी आई वडिलांना देखील बोलावून घेतलं. आमच्यासोबत तो चांगला वागत होता. चांगला बोलत होता. मुलांना खायला देत होता', असं मंगल पाटणकर म्हणाल्या.

'त्या दिवशी आम्हाला खोलीत जायला सांगितलं आणि मुलांच्या पालकांना बाहेर थांबायला सांगितलं. नंतर गेटला लॉक लावला. काही मुलांना नंतर स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर घेऊन गेला. नंतर हे प्रकरण समोर आलं', अशी माहिती पाटणकर आजींनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT