

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यवतमाळच्या समता मैदानात अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडत आहे. कार्यकर्ता मेळाव्यात पक्षप्रवेश सोहळा देखील पार पडला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटात इनकमिंग सुरू आहे. दरम्यान, यवतमाळमध्ये काँग्रेसला फूट पडली असून, काँग्रेसचे माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे.
अवघ्या काही महिन्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षानं कंबर कसली आहे. प्रत्येक नेत्यांकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहेत. अशातच यवतमाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसचे माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी काँग्रेस पक्षाला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यवतमाळच्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. हजारो पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रवीण देशमुख हे नाराज असल्याची चर्चा होती. 'स्थानिक पातळीवरील नेत्यांकडून योग्य वागणूक मिळत नाही. म्हणून आम्ही पक्षाची साथ सोडतोय', असं प्रवीण देशमुख म्हणाले. या पक्षप्रवेशामुळे यवतमाळमध्ये काँग्रेसला धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यवतमाळमधील कार्यकर्ता मेळाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.