KONKAN RAILWAY CHANGES MUMBAI-MADGAON VANDE BHARAT SCHEDULE FROM JUNE 15 DUE TO MONSOON saam tv
मुंबई/पुणे

Vande Bharat : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी! वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून ३ दिवस धावणार; जाणून घ्या वेळापत्रक

CSMT Madgaon Vande Bharat Train Update : कोकण रेल्वे मार्गावर मान्सूनमुळे मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १५ जूनपासून ऑक्टोबरपर्यंत गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.

Alisha Khedekar

  • 15 जूनपासून मुंबई-मडगाव वंदे भारतच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल

  • मान्सून काळातील सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला

  • आठवड्यातून तीन दिवस धावणार वंदे भारत

  • नवीन वेळापत्रक ऑक्टोबरपर्यंत लागू

Kokan Madgaon Vande Bharat Express Update कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी! तळकोकणात मान्सून दाखल झाला असून पुढील काही दिवसांत तो राज्यभरात व्यापण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गावर मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल १५ जूनपासून लागू होणार असून ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर्ण नियोजन करूनच पुढील प्लॅनिंग करावं असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वे मार्ग हा देशातील सर्वात निसर्गरम्य रेल्वे मार्गांपैकी एक मानला जातो. मात्र पावसाळ्याच्या काळात या मार्गावर मुसळधार पाऊस, दरडी कोसळणे आणि रुळांवर पाणी साचण्याच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दरवर्षी रेल्वे प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. याच पार्श्वभूमीवर यंदाही काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. नवीन वेळापत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून मडगावकडे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ( Vande Bharat Express Schedule) आता फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशीच धावणार आहे. तर मडगावहून मुंबईकडे येणारी वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी धावणार आहे. यामुळे ही गाडी आठवड्यातून सहा दिवसांऐवजी केवळ तीन दिवस दोन्ही बाजूने धावणार आहे.

रेल्वे प्रशासनाने हा निर्णय पूर्णपणे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतल्याचे स्पष्ट केले आहे. मान्सून काळात रेल्वे मार्गावर कोणताही अपघात किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष निरीक्षण आणि देखभाल मोहीम राबवली जाते. त्याचबरोबर गाड्यांच्या हालचालींचे नियोजनही बदलण्यात येते.

या बदलाचा परिणाम नियमित प्रवासी तसेच सुट्टीसाठी गोवा (Goa Trip) आणि कोकण (Kokan Trip) भागात जाणाऱ्या पर्यटकांवर होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट बुकिंग (Vande Bharat Ticket Booking) करण्यापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सूनचे विशेष वेळापत्रक (CSMT Madgaon Vande Bharat Monsoon Schedule) लागू करण्यात आले असून, पुढील काही महिन्यांपर्यंत कोकणवासीयांना नव्या वेळापत्रकानुसारच प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Timing: मोठी बातमी! शाळाच्या वेळेत बदल; पुणे महापालिकेनं का घेतला निर्णय?

Loose Motion Remedies : पावसाळ्यात स्ट्रीट फूड खाल्ल्याने जुलाब होतायेत? 'हा' घरगुती उपाय मिनिटांत देईल आराम

Maharashtra News Live Update: परळीत मुसळधार पावसाचे आगमन तर पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा

Rain Alert : पावसाची तुफान बॅटिंग; कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय? VIDEO

Health Care: पावसाळ्यात ही ५ फळे खा; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास होईल मदत

SCROLL FOR NEXT