rayat kranti sanghatana morcha in pune for milk price saam tv
मुंबई/पुणे

Milk Price Issue: दूधदरासाठी पुण्यात रयत क्रांतीचा माेर्चा, संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर धडकली किसान सभा

मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात आंदाेलन तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी राज्य सरकारला दिला.

Siddharth Latkar

- नितीन पाटणकर / सचिन बनसाेडे

Pune News :

दुधाला 34 रूपये दर देण्याचा आदेश काढूनही सहकारी आणि खासगी दुधसंघ दर देत नसल्याने (Milk Price Issue In Maharashtra) आज (मंगळवार) किसान सभेने (kisan sabha) नगर जिल्ह्यातील संगमनेर (sangamner) येथे तसेच रयत क्रांती संघटनेने (rayat kranti sanghatana) पुण्यात (pune) आंदाेलन छेडले. दरम्यान शेतक-यांची हितासाठीची मागणी मान्य झाल्यास आगामी काळात आंदाेलन तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी राज्य सरकारला दिला. (Maharashtra News)

किसान सभेेने दुधाच्या हमी भावासाठी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (dr ajit navale) यांच्या नेतृत्वाखाली हा माेर्चा काढण्यात आला. आंदाेलकांनी प्रांत कार्यालयासमोर दूध ओतून सरकारचा निषेध नाेंदविला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी आंदाेलकांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील (radhakrishna vikhe patil) यांच्यासह सरकार विरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला. सरकारने काढलेल्या आदेशाला दूध संघ महत्व देत नसल्याचा आरोप डॉ. अजित नवले यांनी साम टीव्हीशी बाेलताना केला.

दरम्यान राज्यातील दुधाचे दरा संदर्भात सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने रयत क्रांती संघटनेने दूध उत्पादक शेतकऱ्यांसमवेत आज पुण्यात कावड मोर्चा काढला आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा लालमहाल ते लक्ष्मी रोडच्या प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयापर्यंत जाणार आहे.

साम टीव्हीशी बाेलताना सदाभाऊ खाेत म्हणाले सरकारमध्ये सहयोगी पक्ष असलो तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विरोधात भूमिका घ्यावी लागली तर ती घेणार. शेतक-याच्या दुधाला प्रती लिटर ५ रुपये वाढीव दर मिळावा, त्यासाठी सरकारने अनुदान द्यावे तसेच सहकारी, खासगी दुध संघ वाढीव दर देण्याचा सरकारच्या आदेशाला किंमत देत नाही हे राज्य शासनाने लक्षात घ्यावे असेही खाेत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT