chandrapur  Saam tv
मुंबई/पुणे

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

chandrapur Farmer news : चंद्रपुरातील किडनी विकलेल्या शेतकऱ्याने त्याची व्यथा मांडली आहे. या शेतकऱ्याच्या मदतीला काँग्रेस धावून आली आहे.

संजय तुमराम

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी रोशन कुडे याने मांडली व्यथा

शेतकऱ्याने कंबोडिया गाठून किडनी विकली.

शेतकऱ्याच्या मदतीला काँग्रैस धावली

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिन्थूर येथील रोशन कुडे या तरुण शेतकऱ्याची हृदयद्रावक कहाणी महाराष्ट्र समोर आली आहे. सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकल्यामुळे आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग न उरल्याने, या शेतकऱ्याने थेट कंबोडिया गाठून किडनी विकली.

कंबोडिया येथून या शेतकऱ्यांना व्हिएनतियान या देशात नेण्यात आले. तिथे एका कॉल सेंटरमध्ये नोकरीसाठी पाठवण्यात आले. तिथे दिवसाचे अठरा तास त्याचे काम होते. काम केले नाही तर मारहाण केली जायची. पगार ही दिला जायचा नाही. या शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची भेट घेतली. त्यानंतर वडेट्टीवार यांनी पोलिस आणि त्या देशातील भारताच्या दूतावासाशी संपर्क केला.

रोशन कुडे याने सावकाराकडून एक लाखाचे कर्ज घेतले. पण व्याज लागून ते कर्ज 50 लाखपर्यंत पोहोचले. किडनी एक कोटीत विकली गेली, तरी ज्याची किडनी आहे. त्याला फक्त पाच ते सात लाख देण्यात आले होते. या सर्व जाचाला वैतागून रोशल कुडे आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत पोहोचला होता. पण काँग्रेसने त्याला आधार दिला.

सावकार आणि किडनी विकणाऱ्यांचे एक रॅकेट असून याविरोधात कारवाई करण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पाठपुरावा केला. या प्रकरणी समिती नेमून चौकशीची मागणी देखील केली. राज्यातील शेतकरी उध्वस्त होत आहे. सावकार आणि बँकांच्या कर्जाच्या विळख्यात तो अडकला आहे. एका शेतकऱ्याला वाचवण्यात यश आले पण असे अनेक शेतकरी आजही संघर्ष करत आहेत. रोशन कुडे या शेतकऱ्याने आज आपली कहाणी माध्यमांसमोर मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT