राजकारणात पुन्हा भूकंप होणार? दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? VIDEO

नगरपरिषदा निवडणुकीत एकत्र आलेल्या दोन्ही राष्ट्रवादी आता तीन महापालिकेतही एकत्र आलेत...त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरू लागलीय... अशातच अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत दिलेत... अजित पवार नेमकं काय म्हणाले? दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Ajit pawar and sharad pawar
sharad pawar news Saam tv
Published On

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर टोकाची टीका करणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आल्या... अशातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा रंगलेली असतानाच खुद्द अजित पवारांनीच महापालिकेच्या प्रचारात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत दिलेत. इतकचं काय तर अजित पवारांनी आपले काका शरद पवाराचंही भरभरून कौतुकही केलयं...

दरम्यान याआधीही पिंपरीतील पत्रकार परिषदेवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो असल्याचं पाहायला मिळालं होतं. शरद पवारांचा हा फोटो कायमस्वरुपी राहणार का? असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजित पवार काय म्हणाले ते ऐका...

तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांनी दिलेल्या संकेतांवर नेमकं काय भाष्य केलयं... ही पाहूयात...

Ajit pawar and sharad pawar
RPI पक्षात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा विस्फोट; ऐन निवडणुकीत रामदास आठवलेंची साथ सोडणार का?

ही राष्ट्रवादीची युती पहिल्यांदा झाली नाहीय...यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीतही असचं चित्र पाहयाला मिळालं...तर महापालिका निवडणुकीसाठी पुणे, पिंपरी चिंचवड, परभणी या तीन या तीन ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत.

Ajit pawar and sharad pawar
मुंबईत आणखी एका उमेदवारावर हल्ला; डोकं फुटलं, राजकीय वर्तुळात खळबळ

एकीकडे 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले असतानाच दुसरीकडे अजित पवारांनी शरद पवारांसोबत जुळवून घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरोधात राष्ट्रवादीच्या यशाचा किती गजर होतोय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com