Khopoli Veereshwar Temple Saam TV
मुंबई/पुणे

१८ व्या शतकातील मंदिरात धाडसी चोरी; २८ लाखांची चांदीची पिंड लंपास, पुणे अन् अहिल्यानगरच्या ४ चोरट्यांना ठोकल्या बेड्या

Khopoli Temple Theft : खोपोलीतील १८ व्या शतकातील श्री भगवान वीरेश्वर मंदिरातील २८ लाख रुपये किमतीची १७ किलो वजनाची चांदीची पिंड चोरीप्रकरणी पुणे आणि अहिल्यानगर येथील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Namdeo Kumbhar

Khopoli Veereshwar Temple silver theft case : खोपोलीतील १८ व्या शतकातील ऐतिहासिक श्री भगवान वीरेश्वर (विश्वेश्वर) मंदिरात शनिवारी (१९ जुलै) मध्यरात्री चोरीची एक अतिशय धक्कादायक घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून तब्बल २८ लाख रुपये किमतीची अन् १७ किलो वजनाची चांदीची संपूर्ण पिंड (मुखवटा व आवरण) लंपास केली.

या घटनेमुळे खोपोलीतील भाविक आणि नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. मात्र, पोलिसांनी तातडीने तपास करत पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून ४ सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अमोल कसबे, विकास अगिवले, दिलीप जाधव आणि सखाराम गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अशी उघडकीस आली चोरी:

भाविकांना फक्त पुढच्या दरवाजातून प्रवेश दिला जात असल्याने मंदिराचा मागचा दरवाजा नेहमी बंद असायचा. मात्र, १९ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मागच्या दरवाजाची साखळी आणि कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला. रविवारी पहाटे नेहमीप्रमाणे मंदिर उघडण्यासाठी आलेले साहाय्यक पुजारी किशोर शिगवान (५६) यांच्या ही बाब निदर्शनास आली. गाभाऱ्यातील चांदीचा मुखवटा आणि आवरण गायब असल्याचे दिसताच त्यांनी तत्काळ मंदिर विश्वस्त मंडळाला माहिती दिली. यानंतर पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.

सीसीटीव्ही आणि पोलिसांची धडक कारवाई

घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी तपास चक्रावली. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तोंडाला रुमाल बांधलेले चार चोरटे मध्यरात्री २ च्या सुमारास गर्भगृहात घुसून चांदीचा मुखवटा व आवरण घेऊन पसार होत असल्याचे स्पष्ट दिसले. यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी अनेक विशेष पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी पुणे आणि अहिल्यानगर येथून या चार सराईत आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी चोरीचा माल लपवलेल्या जागेचा खुलासा केला असून, पोलिसांनी सर्व मौल्यवान ऐवज जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Drink : शुगर फ्री ड्रिंक डायबिटीज रूग्णांसाठी हानिकारक की फायद्याचे?

Maharashtra News Live Update: बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवला

Honey Tea : मधाच्या चहाचे ७ फायदे वाचून तुम्ही आजपासून प्यायला सुरुवात कराल, दूध-साखरेचा चहा विसराल

Rasgulla Recipe: गोड खायला आवडतं? मग घरच्या घरी बनवा रसाळ रसगुल्ले, वाचा सोपी रेसिपी

Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितचा निळ्या साडीतील दिलखेचक लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT