Ketan Agarwal Killed Case Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Ketan Agarwal Case: सियाच्या आई-वडिलांची कसून चौकशी, पोलिसांनी विचारलेले ९ प्रश्न कोणते?

Pune Ketan Agarwal Killed Case Update: पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल हत्या प्रकरणात त्याची होणारी बायको सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन अटकेत आहेत. आज लोणावळा पोलिसांनी सियाच्या आई-वडिलांची चौकशी केली.

Priya More
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग

  • लोणावळा पोलिसांनी सियाच्या आई-वडिलांची कसून चौकशी केली

  • चौकशीदरम्यान ९ महत्त्वाचे प्रश्न पोलिसांकडून विचारण्यात आले

  • सिया आणि चेतनच्या नात्याबद्दल पोलिसांनी विचारले सवाल

दिलीप कांबळे, लोणावळा

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाबाबत रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होते आहेत. या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांकडून १० जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. शुक्रवारी सियाचा भाऊ साहिलची पोलिसांनी सखोल चौकशी केली होती. तर आज सियाचे आई-वडील यांची लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. गेल्या २ तासांपासून त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. या चौकशीचे नेतृत्व लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे करत असून तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सियाच्या आई-वडिलांना पोलिसांनी चौकशीदरम्यान ९ प्रश्न विचारले ते कोणते?

- सिया आणि चेतन मित्र होते. त्यांचे प्रेम संबंध होते. याची तुम्हाला कल्पना होती का?

- सियाने चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का?

- सियाच्या संमतीने केतनशी लग्न जुळवलं होतं का?

- सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का?

- सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का?

- लग्न ठरल्यानंतर ही सिया नेहमी चेतनशी भेटत होती. याची तुम्हाला माहिती नव्हती का?

- साहिल आणि चेतन मित्र आहेत हे पण तुम्हाला माहित नव्हतं का?

- लोहगडावर ते तीन वेळा गेले होते. त्यावेळी सियाने काय कारणं सांगितली होती?

- केतनच्या हत्येचा कट रचला जात होता? याबाबत तुम्हाला कल्पना होती का?

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रेनू मित्तल आणि नरेंद्र मित्तल यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. दोघांनीही सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून आपले जबाब नोंदवले आहेत. मित्तल कुटुंबाचा विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबाशी संबंध असून ते ३० ते ३५ वर्षांपासूनचे मित्र आहेत. सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांच्या विवाहाची जुळवाजुळव करण्यात या कुटुंबाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. तसेच काल दिलेल्या मुलाखतीत प्रवीण गोयल यांनीही मित्तल कुटुंबाचा उल्लेख केला होता.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आता आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सियाच्या आई-वडिलांना आज लोणावळा पोलिसांनी चौकशीसाठी लोणावळ्यातील पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले आहे. चौकशी केल्यानंतर पोलिस त्यांना सोडून देणार आहेत. त्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारले. सियाच्या आई-वडिलांनी या प्रकरणात जर सिया दोषी असेल तर तिला केतनला ज्या ठिकाणावरून दरीत ढकलून दिले होते. त्याच ठिकाणावरून ढकलून द्या अशी माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakshabandhan Horoscope: रक्षाबंधनाचा दिवस कोणत्या राशीसाठी ठरणार खास? भावंडांकडून मिळेल प्रेम, आनंद आणि मोठी खुशखबर!

चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय? 300 जणांचा मृत्यू, शेकडो भारतीय बेपत्ता

Facebook, INSTA वर दररोज 6 तासांची बंदी; 18 वर्षांखालील मुलांसाठी कडक नियम

Punjab Politics: भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती होणार की तुटणार? दोन्ही पक्षातील नेमका तिढा काय?

खाऊन पिऊन आंदोलन करा, झिरवाळांचा आदिवासी आंदोलकांना अजब सल्ला

SCROLL FOR NEXT