Rekha Chaudhary elected unopposed in KDMC ward 18A saaam TV Marathi news
मुंबई/पुणे

Municipal Election : निवडणूक निकालाआधीच भाजपनं खातं उघडलं, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रेखा चौधरींची बिनविरोध निवड

Rekha Chaudhary elected unopposed in KDMC ward 18A : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत निकालाआधीच भाजपाने विजयाचे खाते उघडले आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या रेखा राजन चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

Namdeo Kumbhar

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही प्रतिनिधी, कल्याण

BJP unopposed win in Kalyan Dombivli municipal elections : महापालिका निवडणूक निकालाआधीच भाजपनं विजयाचं खातं उघडलं आहे. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीत रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक 18 अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी भाजपच्या रेखा राजन चौधरी यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, दुसरा कोणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळं निकालाआधीच त्या विजयी ठरल्या आहेत. १६ जानेवारी रोजी अधिकृत घोषणा होणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण पूर्वतील पॅनल क्रमांक १८ मधील अ ( नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ) या राखीव जागेसाठी फक्त भाजपाच्या अधिकृत उमेदवार रेखा राजन चौधरी यांचाच अर्ज प्राप्त झाला. इतर कोणत्या पक्षाने अथवा अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे भाजपाच्या रेखा चौधरी यांनी बिनविरोध झाली आहे. फक्त या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ३१ पॅनलमधील १२२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मंगळवारी अखेरचा दिवस होता. १२२ जागांसाठी प्रमुख सर्वच राजकीय पक्षासाठी अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पालिकेच्या कल्याण पूर्वेतील पॅनल क्रमांक १८ मध्ये चार जागा वेगवेगळ्या प्रवर्गासाठी राखीव आहे. या मध्ये १८ -अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ,१८ -ब सर्वसाधारण महिला ,१८ -क सर्वसाधारण व १८ - ड सर्वसाधारण  अशा आहेत . १८ अ या जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे. या जागेवर भाजपाच्या अधिकृत उमेदवार रेखा राजन चौधरी यांच्या व्यतिरिक्त एका ही पक्षाच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वरूण कुमार सहारे यांनी दिली. त्यामुळे  भाजपाच्या रेखा राजन चौधरी यांची बिनविरोध निवड झाली असून त्याच्या विजयाची घोषणा निवडणूक अर्ज छाननीनंतर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Ticket Discount News: प्रवाशांसाठी गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर मिळणार ३ टक्के सूट; वाचा काय आहे 'ही'योजना?

Maharashtra Live News Update: आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे कारागृहातून लढवणार निवडणूक

Bollywood Movies 2026: 'बॅटल ऑफ गलवान' ते 'धुरंधर २'; २०२६मध्ये प्रदर्शित होणार बॉलिवूडचे हे मोठे चित्रपट

Kasba Ganpati : भाविकांसाठी आनंदवार्ता! पुण्यातील प्रसिद्ध मंदिर दर्शनासाठी खुले; वाचा सविस्तर

BMC Election 2026: अखेरच्या क्षणी वंचितकडून काँग्रेसला दणका, १६ वॉर्डमध्ये उमेदवारच नाही; इच्छुकांचा संताप

SCROLL FOR NEXT