Municipal elections : महापालिका निवडणुकीत महायुतीचा पोपट कुठं कुठं मेला? फुटीचा कुणाला फटका?

Political alliance breakup : महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. जागा वाटपाच्या वादामुळे राज्यातील अनेक महापालिकांमध्ये महायुतीची फाटाफूट स्पष्टपणे दिसून आली.
Municipal elections Maharashtra
Municipal elections MaharashtraSaam tv marathi news
Published On

Mahayuti municipal elections Maharashtra : राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील पक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटलेत. मात्र जागा वाटपाच्या रस्सीखेचमुळे महायुतीचा पोपट कुठं कुठं मेलाय...पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आलेत...सत्तेसाठी गळ्यात गळे घालून फिरणारे, एकमेकांचे मित्र महापालिकेत मात्र एकमेकांचे शत्रू झालेत... मुंबई आणि ठाणे वगळता राज्यातील 16 महापालिका निवडणुकीत महायुतीचा पोपट मेला आहे..नेमकी कोणत्या महापालिकेत भाजप आणि शिंदेसेनेची युती फिस्कटलीय...पाहूयात....

महायुतीत कुठं कुठं फाटाफूट

1. पुणे

2. पिंपरी चिंचवड

3. नाशिक

4. सांगली

5. छत्रपती संभाजीनगर

6. नांदेड

7. अमरावती

8. मालेगाव

9. अकोला

10. मिरा-भाईंदर

11. नवी मुंबई

12. धुळे

13. उल्हासनगर

14. जालना

15. लातूर

Municipal elections Maharashtra
पुण्यात शरद पवार-अजित पवारांचं ठरलं, वाचा कोण किती जागा लढवणार

खरं तर महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच भाजपनं अनेक ठिकाणी स्वबळाचे संकेत दिले होते.. भाजपनं महायुती आणि महायुतीशिवाय निवडणूक अशी रणनीती आखल्याचीही चर्चा रंगली होती...त्यात शिंदेसेनेसोबत अखेरच्या दिवसापर्यंत चर्चा सुरू ठेवून संभ्रमाचं वातावरण कायम ठेवलं. आणि याच अस्वस्थतेतून शिंदेसेना आणि भाजपची युती तुटल्याची घोषणा करण्यात आलीय. दुसरीकडे खासदारांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर शिंदेसेना सत्तेतून बाहेर पडणार का? अशी चर्चा रंगली.... त्यामुळे महायुती तुटली नसल्याचं सांगताना शिंदेसेनेच्या नेत्यांची चांगलीच दमछाक झालीय..

Municipal elections Maharashtra
Thane : एकनाथ शिंदेंचा खासदार म्हस्केंना झटका, मुलाचे तिकिट कापले, आनंद आश्रमात कार्यकर्त्यांची गर्दी

महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून शिंदेसेना आणि भाजपमध्ये वेगवेगळ्या कारणांनी धुसफूस सुरुय... त्यानंतरही दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेत.नगरपालिका निवडणुक निकालातही दोन्ही पक्ष पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते.. ही टशन महापालिका निवडणुकीतही असणार आहे .त्यामुळे आता दोन्ही पक्ष टोकाचे आरोप करत एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं महायुतीवर नेमका काय परिणाम होणार... आणि निवडणुकीत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून हेच नेते निवडणुकीनंतर एकत्र येणार का? असा सवाल विचारला जातोय.

Municipal elections Maharashtra
शिंदेंना ठाण्यात जबरी धक्का, उमदेवारी अर्ज भरण्याआधी ४ माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com