Kalyan Dombivli Municipal Corporation Saam Tv
मुंबई/पुणे

KDMC Election : कल्याण डोंबिवलीत महापालिकेच्या १२२ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर, कुठे काय आरक्षण?

Kalyan Dombivli Municipal Corporation Election : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ३१ प्रभागांतील १२२ जागांची प्रारूप आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि महिला प्रवर्गानुसार जागांचे वाटप झाले आहे.

Alisha Khedekar

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी 122 जागांची प्रारूप आरक्षण सोडत जाहीर

अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिला प्रवर्गांना योग्य वाटप

नागरिकांना 17 ते 24 नोव्हेंबरदरम्यान हरकती सादर करण्याची संधी

अंतिम आरक्षण 2 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होणार; राजकीय हालचालींना वेग आला

संघर्ष गांगुर्डे, कल्याण - डोंबिवली प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रारूप आरक्षण सोडत आज कल्याण येथे जाहीर करण्यात आली. एकूण 31 प्रभागांतील 122 जागांसाठी ही आरक्षण सोडत घोषित झाली असून, विविध प्रवर्गानुसार जागांचे वाटप करण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी माहिती देताना सांगितले की, प्रारूप आरक्षण सोडत ही निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी आहे. नागरिक, राजकीय पक्ष किंवा इच्छुक उमेदवारांना जर काही हरकती अथवा सूचना द्यायच्या असतील, तर त्या 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत लेखी स्वरूपात सादर करता येतील.

त्याचप्रमाणे, या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या सर्व हरकती आणि सूचनांचा विचार करून निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण 2 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही गोयल यांनी स्पष्ट केले. या सोडतीत एकूण 31 प्रभागांसाठी 122 जागा राखण्यात आल्या आहेत. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिला प्रवर्गांसाठी आवश्यक त्या प्रमाणात आरक्षणाचे वाटप करण्यात आले आहे.

आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले,कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने राबवली जात आहे. नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना नियोजित कालावधीत सादर करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवावा. प्रारूप आरक्षण जाहीर झाल्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध पक्षांचे पदाधिकारी आता आपापल्या प्रभागातील आरक्षणानुसार पुढील रणनीती आखण्यास सज्ज झाले आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या जागांसाठी आरक्षण सोडत

अनुसूचित जाती (SC): 12 प्रभाग त्यापैकी 6 प्रभाग महिलांसाठी आरक्षित

अनुसूचित जमाती (ST): 3 प्रभाग त्यापैकी 2 प्रभाग महिलांसाठी आरक्षित

इतर मागासवर्गीय (OBC): 38 प्रभाग त्यापैकी 16 प्रभाग महिलांसाठी आरक्षित

सर्वसाधारण प्रवर्ग: 75 प्रभाग त्यापैकी 38 प्रभाग महिलांसाठी राखीव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेनेला मोठं खिंडार! ३५ वर्षांपासूनच्या निष्ठावंताने सोडली उद्धव ठाकरेंची साथ; भाजपचं 'कमळ' घेतलं हाती

निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढणार? राज ठाकरेंवरील विधानामुळे कोर्टाचे चौकशीचे आदेश|VIDEO

Face Care: चेहऱ्यावरील ड्रायनेस किंवा पिंपल्स कमी करायचं आहेत? तर 'हा' घरगुती फेसमास्क आठवड्यातून १ वेळा नक्की ट्राय करा

Maharashtra Tourism : हिवाळ्यात फिरायला जायचंय? महाराष्ट्रातील 'हे' हिल स्टेशन सर्वात बेस्ट

एनडीए की महाआघाडी, बिहारमध्ये यंदा कुणाची सत्ता? एक्झिट पोलमधून धक्कादायक अंदाज समोर, VIDEO

SCROLL FOR NEXT