KDMC clerk arrested by Anti-Corruption Bureau while accepting ₹40,000 bribe for fire NOC in Kalyan. saam tv
मुंबई/पुणे

केडीएमसीत पुन्हा भ्रष्टाचार उघड! ४० हजारांची लाच घेताना लिपिक रंगेहाथ पकडला

KDMC Clerk Caught Taking Bribe For Fire NOC In Kalyan: कल्याण-डोंबिवली महापालिकेतील लिपिक भारत पाटोळे याला अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ अटक केली.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असलेला लिपिक भारत पाटोळे याने एका शाळेला अग्नीशमन दलाचा ना हरकत दाखला देण्याच्या बदल्यात ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. शाळेने लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. लिपीक पाटोळेला शाळेच्या व्यक्तीकडून ४० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली आहे.

साई इंग्लिश स्कूलला अग्नीशमन दलाचा ना हरकत दाखला हवा होता. त्या बदल्यात लिपीक पाटोळे याने शाळेकडे ४० हजार रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी शाळेने लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचला होता. त्यानुसार पाटोळे याला खडकपाडा परिसरात बोलविण्यात आले. ४० हजार रुपयांची लाच स्विकारता पाटोळे याला रंगेहाथ पकडले आहे.

महापालिका भ्रष्टाचारासाठी बदनाम आहे. आत्तापर्यंत महापालिकेतील ४७ अधिकारी कर्मचारी लाच घेताना अटक करण्यात आलेले आहे. पाटोळे हे ४८ वे आहेत.अटकेनंतर भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना निलंबित केले जाते. निलंबनाची कारवाई संपुष्टात आल्यावर भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना पुन्हा महापालिकेतील सेवेत घेतले जाते. सुरुवातीला अशासकीय कामकाज दिले जाते. त्यानंतर पुन्हा हे भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी शासकीय कामकाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन भ्रष्टाचार करण्यासाठी मोकळे होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT