KDMC Roads saam
मुंबई/पुणे

KDMC: रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त ठेकेदार मस्त; प्रशासनाला कधी जाग येणार? शिवसेना माजी नगरसेवकाचा सवाल

KDMC Roads : खड्डे बुजविण्यासाठी आणलेली मशीन वापराविना पडून आहे. खड्ड्यांमुळे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल शिवसेना माजी नगरसेवकाने केलाय.

Bharat Jadhav

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील खड्डे मास्टीक अस्फाल्टींग पद्धतीने बुजविण्याकरीता आणली आहे. मशीन कल्याण पश्चिमेतील अग्नीशमन केंद्राच्या ठिकाणी वापराविना पडून आहे. या मशीनने खड्डे बुजविले जाणार नसतील त्या मशीनचा उपयोग काय ? खड्ड्यांमुळे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल शिवसेना माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केलाय.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका दरवर्षी टेंडर काढून हे काम खासगी ठेकेदारांना देते देते. यंदा देखील महापालिकेच्या १० प्रभागातील खड्डे बुजविण्याचे काम काही ठेकेदारांना विभागून दिले आहे. खड्डे बुजविण्याच्या कामासाठी महापालिकेकडून २२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खडड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाने उघडीप देऊन चार दिवसांचा कालावधी लोटला मात्र अद्यापही खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी नाराजी व्यक्त केली. त्याबाबत बोलताना मोहन उगले यांनी सांगितले की, शहर अभियंता अनिता परदेशी यांनी शहरातील रस्त्यावर खड्डे कमी आहेत, रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी मास्टीक अस्फाल्टींगचा प्रयोग केला जाणार असे सांगितले जाते. त्यासाठी मशीनही आणले आहे. त्याचा वापरही केला जात नाही.

महापालिका २२ कोटी रुपये खर्च करुन खड्डे बुजविणार नसेल तर उर्वरीत पैसे कशावर खर्च केले जाणार आहे, याचा खुलासा महापालिका प्रशासनाने करावा, अशी मागणी उगले यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, दोन तीन दिवसापूर्वी खड्ड्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना तंबी दिली होती. रस्ते दुरूस्तीच्या कामात जर कुठल्या शासकीय यंत्रणांनी अडथळा आणला तर त्याच्यावर एफआयआर दाखल करा, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते.

तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करा, कारणं सांगून टोलवाटोलवी करू नका, असंही म्हटलंय. राज्यभरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. याच बैठकीत मुख्यमंत्री शिंदे अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT