VIDEO: ठाणे महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, अनधिकृत बार-पबवर धडक कारवाई

Action Against Thane Illegal Bar Ad Pub: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून ते नष्ट करण्यात यावेत, असं निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशानंतर ही धडक कारवाई करण्यात आली.

ठाण्यातील अनधिकृत बार अणि पबच्या विरोधात ठाणे महानगर पालिकेने (Thane Municipal Corporation) धडक कारवाईला सुरूवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या अनधिकृत बार आणि पबवर कारवाईला सुरूवात झाली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील (Ghodbandar Road) ओवाळ या ठिकाणी पालिकेने अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला आहे. ठाणे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तामध्ये ही धडक कारवाई केली आहे. जेसीबीच्या माध्यमातून हॉटेल आणि पबचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ते नष्ट करण्यात यावेत, असं निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही धडक कारवाई करण्यात आली. पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रमुख शहरांमधील अनधिकृत हॉटेल, पब आणि बारविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अनेक शहरांमध्ये सध्या पालिकेकडून धडक कारवाई सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com