Kasara ghat Saam Tv
मुंबई/पुणे

Kasara Ghat : मोठी बातमी! मुंबई-नाशिक एक्स्प्रेसवरील कसारा घाट ६ दिवस राहणार बंद, पर्यायी मार्ग काय?

Mumbai Nashik Expressway : रस्ता दुरुस्तीसाठी मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाट बंद राहणार आहे. यासाठी पर्यायी मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. कसारा घाट कधी बंद राहणार आहे? ते जाणून घ्या..

Yash Shirke

Mumbai Nashik Expressway News : मुंबई-नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी पुढील ६ दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सहा दिवस जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अवजड वाहनांना सहा दिवस पूर्णपणे बंदी असणार आहे.

मुंबई नाशिक महामार्गावर सोमवारी २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च ते ६ मार्च या दोन टप्प्यात जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती व पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद राहणार आहे. नाशिकच्या दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे.

सहा दिवस सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या कालावधीत मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. जुना कसारा घाट दुरुस्तीसाठी बंद राहणार असल्याने लहान वाहनांची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे. पण तेथे अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे. ही अवजड वाहने मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात येणार आहेत.

जुन्या कसारा घाटातील डोकावणाऱ्या दरडी, जुने महाकाय वृक्ष या सहा दिवसात काढण्यात येणार आहेत. पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे. सहा दिवसांच्या कालावधीत वाहनचालकांना होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: साई चरणी 20 लाख रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण

Dink Ladoo: साजूक तूपातला डिंकाचा लाडू कसा बनवायचा?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Parliament Winter Session: लोकसभेत गोंधळात 'G Ram G' विधेयक मंजूर, विरोधकांनी फाडल्या विधेयकाच्या प्रती

Face Care: चेहऱ्यावर अ‍ॅलोव्हेरा जेल लावल्याने चेहरा फक्त ग्लो होत नाही तर 'हे' त्रासही होतात कायमचे दूर

SCROLL FOR NEXT