Dhananjay Munde/Karuna Sharma Saam TV
मुंबई/पुणे

धनंजय मुंडेंच्या दबावामुळेच आईची आत्महत्या; करुणा शर्मांचा गंभीर आरोप

मंत्र्यांच्या सांगण्यावरून मी बहिणीला घराबाहेर काढले, त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र, मंत्री महोदयांनीच माझ्या बहिणीच्या मोबाइलवर मेसेज केले.

सुरज सावंत

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत, 'धनंजय मुंडेंच्या दबावामुळेच माझ्या आईने आत्महत्या केल्याचा' गंभीर आरोप केला आहे. करुणा शर्मा (Karuna Sharma) मुलगी शिवानीला सोबत घेऊन पत्रकार परिषद घेणार होत्या. पण ऐनवेळी मुलगी पत्रकार परिषदेस गैरहजर राहिली. शिवानी ही मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात मोठा गौप्यस्फोट करणार होती. मात्र, तिला धमकावल्याने ती पत्रकार परिषदेस गैरहजर राहिल्याचं शर्मा यांनी सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या, 'मंत्र्यांच्या सांगण्यावरून मी बहिणीला घराबाहेर काढले,त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र, मंत्री महोदयांनीच माझ्या बहिणीच्या मोबाइलवर मेसेज केले. त्यानंतर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असा खुलासा त्यांनी यावेळी केला. तसंच धनंजय मुंडे यांच्या दबावामुळे आमच्यावर गुन्हे दाखल करत अटकेची कारवाई केली. तर मुंडें यांच्या दबावामुळेच माझ्या आईने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी यावेळी केला.

हे देखील पाहा -

शिवाय मी मुंडे यांची पहिली बायको असून त्याचे माझाकडे पुरावे आहेत. मी आजपर्यंत माझं तोंड उघडलं नाही, आजपर्यंत मी त्यांची इज्जत करत होते. २००८ पासून मुंडेंवर विश्वास ठेवून मी बहिणींशी बोलत नाही. मुंडेंनी मंत्री पदाचा गैरवापर केला. शरद पवारांनी (Sharad Pawar) मुंडेंना मंत्री पदावरून हाकललं पाहिजे असही त्या यावेळी म्हणाल्या.

माझापासून दोन मुलांना जन्म देऊन आम्हाला रस्त्यावर सोडलं, धनंजय मुंडे यांचे अन्य महिलांशीही अनैतिक संबध आहेत याचे पुरावे माझाकडे आहेत. छत्रपतीच्या नावाने राजकारण करणारे आज का बोलत नाहीत. सुप्रीयाताई यांच्याकडे न्यायासाठी अनेकदा विनंती केली. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

माझी एकच मागणी आहे त्यांच्याकडे धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून हाकलावे. धनंजय मुंडे यांनी इतर महिलांनाही दबाव टाकून गप्प केलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर माझा बहिणीने केलेल्या आरोपांचे पुरावे लवकरच माझी बहिण देईल. तसंच मी मुंडेवरील बलात्काराचा गुन्हा लवकरच उचलून धरणार आहे. माझा बहिणीला मुली प्रमाणे संभाळण्याची ग्वाही देत होते. मात्र, मुलीसोबत असे गैरकृत्य केले. तसंच आपण सीबीआयकडे चौकशीची मागणी केली असल्याचंही करुणा शर्मा यांनी यावेळी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT