शिवसेनेला आगामी काळात वाईट दिवस; गिरीश महाजन यांची टिका

शिवसेनेला आगामी काळात वाईट दिवस; गिरीश महाजन यांची टिका
Girish Mahajan News, Shivsena News, Jalgaon Latest Marathi News
Girish Mahajan News, Shivsena News, Jalgaon Latest Marathi News Saam tv
Published On

जळगाव : शिवसेनेने शॉर्टटर्मचा विचार करून राज्यात मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळविली आहे. मात्र त्यांनी ‘लॉंगटर्म’चा विचार केलेला नाही. त्यांची जनमानसातील प्रतिमा घसरली आहे. येत्या निवडणुकीत जनता त्यांना आपली जागा दाखवून देईल, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षाही शिवसेनेची परिस्थिती अत्यंत वाईट होईल; अशी टिका भाजप नेते आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे. (jalgaon news girish mahajan statement target in shiv sena)

Girish Mahajan News, Shivsena News, Jalgaon Latest Marathi News
एलआयसी एजंट कामाच्या नावाने सावकारी; करोडो रुपयांच्या रोकडसह ताब्‍यात

जळगाव (Jalgaon) जिल्हाधिकारी कार्यालयात माध्‍यमांशी बोलताना ते म्हणाले, की महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) पक्षांनी आमच्यावर कितीही टिका केली, तरी काहीही फरक पडणार नाही. त्यांची जनमानसातील प्रतिमा ढासळली आहे. शिवसेनेला (Shiv Sena) तर कॉंग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा आगामी काळात वाईट दिवस येणार आहेत. (Jalgaon Political News in Marathi)

शिवसेनेचा भोंगा रोज वाजतो

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टिका केली, ते म्हणाले संजय राऊत हे शिवसेनेचा भोंगा आहेत. दररोज सकाळी हा भोंगा वाजतो. त्यांच्याकडे राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता याचे कोणतेही प्रश्‍न नसतात. त्यांच्याकडे किरीट सोमय्या, राणा कुटुंब आणि ईडी हेच विषय असतात. आता लोकांना त्याचा कंटाळा आला आहे.

शिवसेनेने धनदांडग्यांना तिकीट दिले

भाजपने निष्ठावंतांना डावलून दुसऱ्यांनाच राज्यसभेत उमेदवारी दिली, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, की शिवसेनेने दुसऱ्यावर आरोप करताना चार बोटे स्वत:कडे आहेत, हे लक्षात घेऊन बोलावे. त्यांनी या अगोदर रामनिवास धूत, प्रितिश नंदी, संजय निरुपम, प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवार दिली होती. हे कोणते निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांनी धंडदांडगे आणि उद्योजकांना उमेदवारी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com