एलआयसी एजंट कामाच्या नावाने सावकारी; करोडो रुपयांच्या रोकडसह ताब्‍यात

एलआयसी एजंट कामाच्या नावाने सावकारी; करोडो रुपयांच्या रोकडसह ताब्‍यात
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : धुळे शहरामध्ये एलआयसी एजंट कामाच्या पडद्याआड सावकारी धंदा सुरू होता. हा धंदा करणाऱ्या एका सावकाराला पोलिसांनी (Police) कोट्यावधी रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. (dhule news Lending in the name of LIC agent work In possession of crores of rupees in cash)

Dhule News
पितळ, चांदीच्‍या पत्र्यावर सुंदर नक्षीकाम; चित्रकलेल्‍या आवडीतून कला

अवैधपणे सावकारी विरोधात धुळे (Dhule) पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. यातूनच सावकारांतर्फे पिळवणूक होत असल्याची तक्रार आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती. या तक्रारीबाबत पोलिसांनी तपास केला असता धुळे शहरातील राजेंद्र जीवनलाल बंब या खासगी सावकाराचे नाव उघडकीस आले आहे. या खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून संबंधित तक्रारदार व्यक्तीने आझादनगर पोलिसांना संपूर्ण माहिती दिली व या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर संबंधिताच्या घरी व आणखी एका ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात जवळपास कोट्यावधींची रोकडसह कोरे चेक त्याचबरोबर कोरे स्टॅम्प ज्यावरती सावकारी कर्ज घेणाऱ्यांच्या सह्या देखील घेण्यात आले आहेत. तसेच सोन्याचे दागिने देखील पोलिसांच्या हाती लागली आहे. हा सावकार सावकारी कर्ज घेण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला जबरदस्तीने आपल्याकडून पॉलिसी देखील खरेदी करण्यास लावत असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

तीन बँकेतील लॉकर सील

खाजगी सावकाराचे शिरपूर पीपल्स बँक, जळगाव पीपल्स बँक व योगेश्वर पतपेढी याठिकाणी लॉकर असून हे लॉकर देखील सील करण्यात आले आहेत. या लॉकरमधून देखील सावकारी कर्ज वाटप करताना जमा केलेली कागदपत्र मिळून येण्याची शक्यता पोलिसांतर्फे वर्तविण्यात आले आहे. यासंदर्भात या सावकार विरोधामध्ये आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे संपूर्ण जिल्हाभरातील अवैधपणे सावकारी करणाऱ्या सावकारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

जप्त केलेला मुद्देमाल असा

दोन ठिकाणापैकी एका ठिकाणी- एक कोटी ३० लाख १ हजार १५० रुपये रोकड. ४६ लाख २२ हजार ३७८ रुपयांचे ९७८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३८ कोरे चेक, सही केलेले ३३ कोरे स्टॅम्प, दहा सौदा पावत्या व ५९ खरेदीखत कागदपत्र.

दुसऱ्या ठिकाणी मिळालेला मुद्देमाल- बारा लाख नऊ हजार चारशे रुपयांची रोख रक्कम, ३ सौदा पावत्या, पंचेचाळीस खरेदी खताचे कागदपत्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com