panvel -karjat  Saam tv
मुंबई/पुणे

कर्जतहून पनवेलला अवघ्या काही मिनिटांत पोहोचणार; नव्या रेल्वे मार्गिकेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

panvel -karjat railway project : कर्जतहून पनवेलला अवघ्या काही मिनिटांत पोहोचणार आहे. नव्या रेल्वे मार्गिकेबाबत महत्त्वाची अपडेट हाती आलं आहे.

Vishal Gangurde

कर्जत-पनवेल रेल्वे मार्गिकेबाबत महत्वाची अपडेट

नवा रेल्वे प्रकल्प ठरणार गेमचेंजर

खासदार बारणे यांनी केली प्रकल्पाची मागणी

कर्जत-पनवेल रेल्वे मार्गिकेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या नव्या रेल्वे मार्गिकेमुळे रायगड आणि नवी मुंबईतील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार नाही. पनवेल आणि कर्जतला जोडणाऱ्या गेमचेंजर प्रकल्पामुळे वेळेचे मोठी बचत होणार आहे. नागरिकांना सुखद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या कामाची पाहणी केली. या प्रकल्पाचं जवळपास ९० टक्के पूर्ण झालं आहे. पुढील २ महिन्यात हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे. नव्या मार्गिकेमुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

कसा आहे नवा रेल्वे मार्ग?

२९.६ किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग महत्वाचा मानला जातंय. पनवेल ते कर्जत असा प्रवास करण्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागतो. मात्र, नव्या मार्गिकेमुळे अवघ्या ३० ते ३५ मिनिटांत पोहोचता येणार आहे.

पनवेल-कर्जत मार्गावर किती स्टेशन असणार?

पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावर एकूण ५ स्टेशन आहेत .

पनवेल

चिखले

मोहापे

चौक

कर्जत

सध्या पनवेल स्टेशनवर प्रवाशांची गर्दी आणि पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी सिडकोचा राखीव प्लॉट पार्किंगसाठी उपलब्ध केला जाणार आहे.

पनवेल-कर्जत रेल्वे मार्गामुळे प्रवाशांसहित या भागाचा आर्थिक विकास होण्याच वाढ होईल. नव्या मार्गिकेमुळे कर्जत, खोपोली आणि नवी मुंबईत औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. भविष्यात या भागातील घरांची मागणी वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT