हार्बर मार्गावरून लवकरच धावणार जलद लोकल; कसा असेल संपूर्ण प्रकल्प? महत्त्वाची माहिती समोर

harbour line fast local service : हार्बर मार्गावरून लवकरच जलद लोकल धावण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची महत्वाची माहिती समोर आली आहे.
harbour line
harbour line fast local service Saam tv
Published On
Summary

हार्बर रेल्वेच्या विकासासाठी उचललेले ठोस पाऊल

मुंबई, नवी मुंबई, तिसऱ्या मुंबईच्या कनेक्टिव्हिटीसाठी रेल्वे उचलणार मोठं पाऊल

एमयुटीपी-४ सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून हार्बर रेल्वेच्या विकासासाठी ठोस पावले उचलले जाताहेत. मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईशी जलद कनेक्टिव्हिटी करण्याचा विचार रेल्वे करत आहे. हार्बर मार्गावर स्वतंत्र मार्गिकेची चाचपणी केली जाणार आहे. एमयुटीपी-४ प्रकल्पाअंतर्गत सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हार्बर मार्गिकेवरील छत्रपत्री शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान धिम्या गतीने लोकल धावतात. या मार्गावर जागेअभावी अतिरिक्त ट्रॅकचे काम करणे मुश्कील झालंय. हार्बर मार्गावर केवळ धिम्या ट्रॅकवरच लोकल धावतात. पनवेल आणि नवी मुंबई भागात लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

harbour line
Western Railway News : विरार-डहाणूकरांसाठी मोठी बातमी, १५ डब्यांची लोकल धावली, तिकीट किती? कोणते थांबे असणार?

वाढत्या गर्दीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. यामुळे एमआरव्हीसीने हार्बर विस्तारीकरण एमयुटीपी-4 प्रकल्प मार्गी लावण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू आली आहे. या मार्गावर जलद मार्गिकेचे काम कोणत्या भागातून करायचे, याचा अभ्यास केला जात आहे. ठाणे-बोरिवली, वांद्रे-कुर्ला अशा प्रकारे रेल्वे कनेक्टिव्हिटी करण्यात येऊ शकते का, याचा देखील अभ्यास करण्यात येईल.

सध्या मुंबई भागातील पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्यात येणार आहे. यासाठी ट्रेन कंट्रोल अँड मॉनिटरिंग सिस्टिम’ लागू येत आहे. तसेच दोन्ही मार्गिकांवरील रेल्वेच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचेही काम केले जात आहे. लोकलच्या डब्यांची संख्या वाढवल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.

harbour line
मुंबईतील पहिला अंडरग्राऊंड महामार्ग, ४० मिनिटांचा प्रवास ५ मिनिटांत होणार; कसा असेल संपूर्ण मार्ग?

पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गवरील लोकल प्रवास अधिक सुकर करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा, असं उद्दिष्ट एमआरव्हीसीचे आहे. त्यानुसार, नॉन एसी गाड्यांचे भविष्यात एसी गाड्यांमध्ये रुपांतर केले जाणार असल्याचे सांण्यात येत आहे. दोन्ही मार्गावर २३८ नवीन डिझाइनच्या एसी लोकल सेवेत दाखल होणार आहेत. यासाठी निविदा ही जूनपर्यंत अंतिम करण्यात येणार असल्याचं एमआरव्हिसीने स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com